Nashik News Chagan Bhujbal Wishes Aditya Thakrey | Sarkarnama

छगन भुजबळांच्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा...म्हणले, युवा चेहरा पुढे येतोय

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासहीत अनेकांना नगरसेवक, महापौर, आमदार केले. आता ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे हा युवा चेहरा यंदा पुढे येतोय. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासहीत अनेकांना नगरसेवक, महापौर, आमदार केले. आता ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे हा युवा चेहरा यंदा पुढे येतोय. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस आघाडीचे इगतपुरी मतदारसंघातील उमेदवार हिरामण खोसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राज्यातील राजकारणात आपला ठसा उमटवला. माझ्यासह अनेक त्यांच्यामुळे नगरसेवक, महापौर, आमदार झाले. मात्र, त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही. युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्या निमित्ताने एक युवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा." 

ते पुढे म्हणाले, ''राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी आहे. त्यात अन्य पक्षांचा समावेश करुन महाआघाडी बनली आहे. या महाआघाडीतील पक्षांना काही जागा सोडाव्या लागतात. तसे न केल्यास महाआघाडीला काय अर्थ? त्यामुळे नाशिक शहरातील पूर्व मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाच्या जोगेंद्र कवाडे गटाला सोडला जाण्याचे संकेत आहेत." नाशिक पश्चिम मतदारसंघ डाव्या आघाडीला सोडण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख