शिवाजी चुंभळेंच्या घरी सापडले परदेशातून आणलेले मद्य, पिस्तुल आणि 30 तोळे सोने

कंत्राटी कामगारांना नियुक्तिपत्र देण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल (दि. 16) रंगेहाथ पकडले.सिडकोतील शिवाजी चुंभळे यांच्या पांडुरंग निवासस्थानी दुपारी 2 वाजेपासून घराची झाडाझडती सुरू केली. ते काम आज पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते.
शिवाजी चुंभळेंच्या घरी सापडले परदेशातून आणलेले मद्य, पिस्तुल आणि 30 तोळे सोने

नाशिक : कंत्राटी कामगारांना नियुक्तिपत्र देण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल (दि. 16) रंगेहाथ पकडले. त्यांच्या निवासस्थानी, तसेच इतर ठिकाणी एसीबीच्या तीन पथकांनी झाडाझडती घेतली असता एक पिस्तुल, 30 तोळे सोने, एक किलो चांदी जप्त करण्यात आली, तर तेथे 90 हजार रुपयांचे परदेशी मद्य मिळाले. ते एका खोलीत सीलबंद करण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे, पोलीस हवालदार मुरकुटे, पोलीस नाईक मनोज पाटील, पोलीस निरीक्षक निकम, अहिरराव व त्यांच्या सहकार्‍यांनी काल (दि. 16) ही कारवाई केली. या कारवाईत एसीबीने अंबड पोलीस ठाण्याचीही मदत घेत सिडकोतील शिवाजी चुंभळे यांच्या पांडुरंग निवासस्थानी दुपारी 2 वाजेपासून घराची झाडाझडती सुरू केली. ते काम आज पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते. 

या झाडाझडतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन पथके नेमली होती. यामध्ये सिडकोतील पांडुरंग निवास, गौळाणे येथील फार्म हाऊस, तसेच इतर ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली. या झाडाझडतीत एक पिस्तुल सापडले असून, ते परवाना असलेले पिस्तूल असल्याचे चुंभळे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 30 तोळे सोने, एक किलो चांदी, 90 हजारांचे विदेशी मद्य सापडले असून, हे मद्य एका खोलीत सील केले आहे. ठिकठिकाणी सुरू असलेले झाडाझडतीचे काम अद्याप सुरूच असून, चुंभळे यांचे काही बँकांमध्ये लॉकर्स आहेत. ते लॉकर्स तपासण्याचे काम सुरू असून, हे काम आजही सुरूच राहणार असल्याचे समजते. 

दरम्यान, चुंभळे यांची रात्री पुन्हा एसीबीमार्फत चौकशी केली असता आपला मुलगा मुंबईला असून, त्याने कोणाला दमदाटी केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रात्री त्यांना पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आल्याचे समजते. आज सकाळी पुन्हा त्यांची एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात येणार असून, दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com