'राष्ट्रवादी'च्या अनिता भामरे म्हणाल्या....महिलांना हिरोईन म्हणा, महिलांसाठी तुम्ही हिरो नाहीच

भारतीय जनता पक्षाचे नेते महिलांबाबत अतिशय दुटप्पी आहेत. महिलांविषयी ते "कही पे निगाहे, कही पे निशाणा'' असे बेताल आहेत. त्यांनी महिलांना हिरोईन म्हटले तरी ते महिलांसाठी हिरो होणारच नाही. त्यामुळे त्यांनी लवकर सभ्यतेचा मार्ग धरावा हे बरे, अशा टोमणा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी मारला आहे
Nashik NCP Leader Anita Bhamare Criticism on Babanrao Lonikar
Nashik NCP Leader Anita Bhamare Criticism on Babanrao Lonikar

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे नेते महिलांबाबत अतिशय दुटप्पी आहेत. महिलांविषयी ते "कही पे निगाहे, कही पे निशाणा'' असे बेताल आहेत. त्यांनी महिलांना हिरोईन म्हटले तरी ते महिलांसाठी हिरो होणारच नाही. त्यामुळे त्यांनी लवकर सभ्यतेचा मार्ग धरावा हे बरे, अशा टोमणा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी मारला आहे.

या संदर्भात भामरे यांनी बबनराव लोणीकर यांचा निषेध केला आहे. काल लोणीकर यांनी तहसीलदारांना उद्देशून असभ्य शब्द वापरले होते. याबाबत अनिता भामरे म्हणाल्या, ''भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर येथील महिला तहसीलदार 'हिरोईन' सारख्या दिसतात असे बेताल वक्तव्य केले आहे. यापूर्वी मागील पाच वर्ष भारतीय जनता पक्षाचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होते. ह्या सरकार मधील मंत्र्यांच्या महिलां विषयी काय भावना आहेत हे नेहमीच यांच्या कार्य प्रणालीद्वारे, भाषणातून दिसून येते. सत्तेत असताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दारूची विक्री वाढवण्याची शक्कल म्हणून दारुच्या बाटल्यांना महिलांची नावे द्यावीत, असे विधान केले होते. आमदार राम कदम दहीहंडीच्या कार्यक्रमात तरूणांना लग्नासाठी जी मुलगी आवडेल तिला पळवुन आणण्याची भाषा करतात. यातून या पक्षाची संस्कृती प्रकट होते.''

त्या पुढे म्हणाल्या, ''यावर आता आमदार लोणीकर शेतकरी मोर्चासाठी गर्दी व्हायला पाहिजे म्हणून एखादी चित्रपट अभिनेत्री ( हिरोइन ) आणू या किंवा हिरोइन नाही मिळाली तर आपल्याच तालुक्‍याच्या तहसीलदार 'हिराॅईन' आहेतच, असे वक्तव्य करतात. यातून या नेत्यांची महिलांना बघण्याची नजर स्पष्ट होते. खरं तरं नेत्यांनी महिलांविषयी बोलतांना भान ठेवायला पाहिजे. आपल्याला जन्म देणारी एक महिलाच आहे. आपल्या घरात पत्नी, बहिण, मुलगी याही महिलाच आहेत.''

''लोकांचा प्रतिसाद नाही, सत्तेत नसल्याने आपली जीभ घसरली असावी. त्यांनी महिलांचा उद्रेक होण्याआधीच महिला तहसीलदार, समस्त महिलांची माफी मागावी. कारण आपण जरी महिलांना हिरोईन समजता तरी महिला मात्र आपल्याला हिरो समजत नसून भाऊच समजता, तेव्हा मोठे मन करा आणि महिलांची माफी मागा,'' असे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता महेश भामरे प्रसिध्दीस तसेच सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com