'राष्ट्रवादी'च्या पावसेंचा पुरोगामी पुढाकार; अस्थी विसर्जनाऐवजी आंबा, फणसाच्या झाडांची लागवड

पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी गावातील मृत व्यक्तीच्या अग्नि अग्निसंस्कारानंतरअस्थी व रक्षा नदीपात्र किंवा तीर्थक्षेत्री असलेल्या जलप्रवाहात विसर्जित न करता आपल्या शेतात किंवा घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकाव्यात. त्यामध्ये केशर आंबा, फणस यासारखी फळझाडे त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ लावण्याचा संकल्प साकूर गावाने केला.
Nashik NCP Deputy Sarpanch Started New Tradition After Mothers Death
Nashik NCP Deputy Sarpanch Started New Tradition After Mothers Death

नाशिक  : व्यक्तीच्या निधनानंतर अग्निसंस्कार झाल्यावर अस्थी, रक्षा विसर्जनाची रुढ परंपरा आहे. मात्र, त्यातून होणारे जलप्रदूषण थांबविण्यासाठी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपसरपंच बाळासाहेब पावसे व त्यांचे बंधू सोसायी संचालक यांनी ती प्रथा बंद करावी असे आवाहन केले. त्याची सुरवातही स्वतःपासून केली. आपल्या मातोश्रींच्या निधनानंतर शेतात, घरानजीक जमिनीत त्यांच्या अस्थींचे विसर्जन करुन त्यात स्मृती म्हणून आंबा, फणसाची फळझाडे लावली. ग्रामस्थांनीही त्याचे स्वागत केल्याने एक पुरोगामी व धाडसी परंपरा सरु झाली आहे.

पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी गावातील मृत व्यक्तीच्या अग्नि अग्निसंस्कारानंतर अस्थी व रक्षा नदीपात्र किंवा तीर्थक्षेत्री असलेल्या जलप्रवाहात विसर्जित न करता आपल्या शेतात किंवा घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकाव्यात. त्यामध्ये केशर आंबा, फणस यासारखी फळझाडे त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ लावण्याचा संकल्प साकूर गावाने केला. गावात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. त्यात प्रबोधन झाले. त्यातूनच अस्थिविसर्जनाची परंपरा बंद करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले.

ज्येष्ठ नेते विष्णू पावसे, माजी उपसरपंच बाळासाहेब पावसे, सोसायटीचे संचालक सुरेश पावसे यांच्या मातोश्री तुळसाबाई पावसे यांचे निधन झाले. त्यांच्या अस्थी आणि रक्षा विसर्जन कुठल्याही नदीत न करण्याचा निर्णय पावसे कुटुंबियांनी घेतला. त्यातून त्यांनी एक प्रथा बंद करुन सर्वांसमोर आदर्श निर्माण केला. साकूरच्या अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख महाराजांनी केलेले उद्‌बोधन त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी अस्थी व रक्षा जलप्रवाहात विसर्जित न करता आपल्या शेतात किंवा घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकाव्यात. त्यावर केशर आंबा, फणस यांसारखी फळझाडे लावण्यात यावीत, असे प्रबोधन झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com