आरक्षणाच्या निर्णयाने मुस्लिम समाज आनंदला...म्हणूनच झाले लाडू वाटप

आघाडी सरकारने मुस्लिम समाजास शिक्षणात पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते. आरक्षण लागू होण्याच्या पूर्वीच सरकार बदलले. भाजप सरकारने मुस्लिमांचे आरक्षणाचा निर्णय रद्द केला. तेव्हापासून मुस्लिम समाज, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तसेच अन्य विविध संघटनांकडून आरक्षणाच्या मागणी घेऊन लढा सुरु होता
Muslim Commuity Distributed Sweets after Reservation Decission
Muslim Commuity Distributed Sweets after Reservation Decission

नाशिक : महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याबाबत विधान परिषदेत केलेल्या वक्तव्याने या समाजात आनंदाचे वातावरण आहे. लवकरत त्याबाबातचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रदिर्घ काळ या मागणीसाठी लढा देणाऱ्या मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीतर्फे सरकारचे आभार मानण्यात आले. त्यामुळे शहरात लाडू वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

आघाडी सरकारने मुस्लिम समाजास शिक्षणात पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते. आरक्षण लागू होण्याच्या पूर्वीच सरकार बदलले. भाजप सरकारने मुस्लिमांचे आरक्षणाचा निर्णय रद्द केला. तेव्हापासून मुस्लिम समाज, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तसेच अन्य विविध संघटनांकडून आरक्षणाच्या मागणी घेऊन लढा सुरु होता. या विषयी विधान परिषदेत महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले. लवकरच आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात येवून आरक्षण लागू करण्याची भूमिका घेतली. सरकारच्या या भूमिकेचे मुस्लिम समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे.

त्यानिमित्ताने शनिवारी दुपारी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीतर्फे जुने नाशिक चौक मंडई येथे महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करणारे फलक लावून लाडू वाटप केले. सरकारने आरक्षण देण्यासाठी दाखविण्यात आलेली सकारात्मकता लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरवावी, अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली. यावेळी समितीचे प्रदेशाध्यक्ष अजिज पठाण, मुश्‍ताक शेख, मुक्तार शेख, फरीद शेख सादीक कुरैशी, बशिर शेख, आदील शेख, सलीम शेख, सांडु शेख, जमीर शेख, इकबाल काझी, शकील बाबा, रियाज मुलतानी, राजु शेख, निसार शेख, जब्बार सय्यद आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीने मुस्लिम आरक्षणास घेऊन दाखविलेली सकारात्मकता अभिनंदनीय आहे-  वसीम पिरजादा, मौलवी

मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती आणि समाजाच्या लढ्यास यश मिळत असल्याचे दिसत आहे. येणाऱ्या दिवसात अध्यादेश काढण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्याचे स्वागत करतो -  अजीज पठाण, प्रदेश अध्यक्ष, आरक्षण समिती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com