Nashik MP Harishchandra Chavan About Adiwasi Cast Theft | Sarkarnama

खासदार हरिशचंद्र चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर...आदिवासींची जात चोरली जात असल्याचा आरोप 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

वस्तू, संपत्तीची चोरी नवी नाही. मात्र, सध्या या पारंपारीक चोऱ्यांपेक्षाही आदिवासींची जात चोरण्याचा धंदा तेजीत आहे. बनावट जात प्रमाणपत्रांद्वारे आदिवासींची जात चोरली जाते. त्यातुन खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या, न्याय्य हक्कावर गदा येत आहे. केंद्र सरकारने यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी केली आहे. 

नाशिक : वस्तू, संपत्तीची चोरी नवी नाही. मात्र, सध्या या पारंपारीक चोऱ्यांपेक्षाही आदिवासींची जात चोरण्याचा धंदा तेजीत आहे. बनावट जात प्रमाणपत्रांद्वारे आदिवासींची जात चोरली जाते. त्यातुन खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या, न्याय्य हक्कावर गदा येत आहे. केंद्र सरकारने यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी केली आहे. 

शुक्रवारी लोकसभेत त्यांनी हा विषय मांडला. ते म्हणाले, ''आदिवासींसाठी अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात बिगर आदिवासी लोक आदिवासी जातीत येण्या साठी खोटे आदिवासी प्रमाण पत्र बनवून आणतात. त्याचा उपयोग आदिवासींच्या आरक्षित नोकरी मिळविण्यासाठी उपयोग करत आहेत. आदिवासी खोटे प्रमाणपत्र बनविण्याचा काळाबाजार अनेक वर्षान पासून मोठया प्रमाणात चालू आहे. आरक्षणाचा फायदा मुळ आदिवासींना होत नाही. राजकीय दबावाखाली काही जातींना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळविण्यासाठी शिफारशींवर दिला जातो.'' 

खासदार चव्हाण यांनी सरकारला विनंती केली की, तरोडा (बुलढाणा) गावात एकही आदिवासी कुटुंब रहात नाही. मात्र, तेथील शाळेत 250 ते 300 आदिवासी विद्यार्थी आहेत. गावात एकही आदिवासी नसताना एव्हढ्या मोठया प्रमाणात आदिवासी विद्यार्थी आले कुठून?, हा अतिशय गंभीर मुद्दा असून त्यावर अतिशय कडक कारवाई करावी. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख