निकृष्ठ दर्जाच्या रस्ता डांबरीकरणाला मनसेचा आक्षेप

नाशिकरोडच्या प्रभाग २० मधील शिखरेवाडी भागात काल ( दि.२०) रस्ता डांबरीकरणाला विरोध करण्यात आला. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे निदर्शनाला आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला
Nashik MNS Takes Objection to Low Quality Road Construction
Nashik MNS Takes Objection to Low Quality Road Construction

नाशिक रोड ( प्रतिनिधी) : नाशिकरोडच्या प्रभाग २० मधील शिखरेवाडी भागात काल ( दि.२०) रस्ता डांबरीकरणाला विरोध करण्यात आला. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे निदर्शनाला आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला. योग्य पध्दतीने व नियमांचे पालन करून पक्का रस्ता करण्यात यावा असे ठेकेदार, सुपरवायझर व सिव्हिल इंजिनिअर यांना बजावण्यात आले. मनसेचे स्थानिक दक्ष कार्यकर्ते रोहन देशपांडे व सुजाण नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पैशांचा दुरुपयोग न होता दर्जेदार रस्ता तयार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

 गेल्या २० दिवसांपासून हॉटेल करी लिव्हज ते शिखरेवाडी कारंजा दरम्यानचा सुमारे १ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. मात्र, काल सकाळी हे काम योग्य पध्दतीने होत नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी मनसेचे जागृत कार्यकर्ते रोहन देशपांडे यांच्या निदर्शनास ही बाब आणली. देशपांडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सुपरवायझर कैलास लोळगे व सिव्हिल इंजिनिअर राहुल वाघ यांना जाब विचारला. 

वास्तविक रस्त्याचे काम तीन थरांमध्ये होणे आवश्यक असते. प्रत्यक्षात मातीच्या थरावर सबबेस करुन नंतर इमल्शन व ऑइल पसरुन वर डांबरीकरण करणे गरजेचे असते. १ किलोमीटरच्या या रस्त्यावर केवळ मातीच्या थरावर डांबर पसरण्यात आले. योग्य पध्दतीने हे काम न झाल्याने तो लवकरच खचेल व पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडतील. रस्त्याची उंची वाढल्याने बाजूची घरे, दुकाने यामध्ये पाणी शिरण्याचा धोका संभवतो. हे सारे निदर्शनास आणण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत संबंधित काम संपवून निघून गेले. या सगळ्या कामात नियम, पद्धत धाब्यावर बसविण्यात आली. त्यामुळे  यापुढे कामात सुधारणा न झाल्यास ते बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com