Nashik MNS Agitation for Botanical Garden | Sarkarnama

राज साहेबांनी उभारले अन्‌ तुम्ही खुऽऽशाल घालवले : नाशिक मनसे 

संपत देवगिरे 
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असतांना राज ठाकरे यांनी शहराच्या विकासात अन्‌ सौदर्यांत भर घालणारे विविध प्रकल्प साकारले. त्यासाठी त्यांनी आपरली कल्पकता, कौशल्य आणि लोकसंपर्क उपयोगात आणला. टाटा समुहासह विविध औद्योगिक संस्थांच्या सीएसआर निधीतुन नाशिक- मुंबई महामार्गावर वन विभागाच्या दीडशे एकरच्या उद्यानात बॉटेनिकल उद्यान उभारले. त्यात लेझर शो सुरु केला. हा लेझर शो सुरु झाल्यावर उद्योगपती रतन टाटा यांनी त्याला भेट दिली होती. पर्यटकांचा मोठा प्रतिसाद त्याला लाभला. मात्र, काही दिवसांतच तो बंद पडला. वन विभागाने त्याकडे फारसे लक्षही पुरवेल नाही.

नाशिक : "नाशिकचे बॉटनिकल उद्यान राज्यभरातील पर्यटकांसाठी आकर्षण झाले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महापालिकेचा एक पैसाही न घेता ते उभारले. शहराला देणगी दिली. भाजपचे नेते मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. महापालिका प्रशासनाने खुऽऽशाल ते घालवले," असे संतप्त प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर केले. दीड तास हे नेते तेथे ठिय्या देऊन बसल्यावर हतबल झालेल्या वनविभागाने महिनाभरात ते पुर्ववत सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. 

महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असतांना राज ठाकरे यांनी शहराच्या विकासात अन्‌ सौदर्यांत भर घालणारे विविध प्रकल्प साकारले. त्यासाठी त्यांनी आपरली कल्पकता, कौशल्य आणि लोकसंपर्क उपयोगात आणला. टाटा समुहासह विविध औद्योगिक संस्थांच्या सीएसआर निधीतुन नाशिक- मुंबई महामार्गावर वन विभागाच्या दीडशे एकरच्या उद्यानात बॉटेनिकल उद्यान उभारले. त्यात लेझर शो सुरु केला. हा लेझर शो सुरु झाल्यावर उद्योगपती रतन टाटा यांनी त्याला भेट दिली होती. पर्यटकांचा मोठा प्रतिसाद त्याला लाभला. मात्र, काही दिवसांतच तो बंद पडला. वन विभागाने त्याकडे फारसे लक्षही पुरवेल नाही.

त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी आज वन विभागाच्या कार्यालयात जाऊन तासभर ठिय्या दिला. यावेळी प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी संतप्त होत, "राज साहेबांनी उभारले अन्‌ तुम्ही खुऽऽशाल ते वैभव घालवले! हे चालु देणार नाही," असे त्यांनी वनअधिकाऱ्यांना सुनावले. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी पी. एस डमाळे यांनी महिनाभरात संगीत कारंजे व लेझर शो पुर्ववत सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतरच कार्यकर्ते बाहेर पडले. प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हा अध्यक्ष अनंता सुर्यवंशी, शहराध्यक्ष अनिल मटाले, महापालिकेतील गटनेते सलीम शेख, श्‍याम गोहाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. उद्यान पुर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख