इंधन दरवाढीविरोधात आमदार निर्मला गावितांचा सायकल मोर्चा

आमदार गावित यांच्या संपर्क कार्यालयापासून सकाळी अकरा वाजता सायकलवरून आमदार गावितांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता, शहरातून भंडारदरा चौक,वासुदेव चौक, मायाबाजार, कृषी उत्पन्न बाजार सामिर्ती मार्गे भाजपा सरकार विरोधात विविध घोषणाबाजी करत घोटी पोलीस ठाण्यात मोर्चाची सांगता झाली यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते भाववाढीच्या निषेधाचे फलक घेत भर उनातान्हात सहभागी झाले होते.
इंधन दरवाढीविरोधात आमदार निर्मला गावितांचा सायकल मोर्चा

नाशिक : ''पोकळ आश्वासनाने देश चालत नाही, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असतांनाच पेट्रोल डिझेल, गॅस दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे सरकारने हाल केले  आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत असून ते सामान्यांना परवडणारे नाही. सरकारच्या या धोरणामुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ आम्ही काँग्रेसच्या वतीने सायकल मोर्चा काढत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला," असे प्रतिपादन आमदार निर्मलाताई गावित यांनी घोटी येथे शनिवारी पेट्रोल डिझेल दरवाढ निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान केले.

आमदार गावित यांच्या संपर्क कार्यालयापासून सकाळी अकरा वाजता सायकलवरून आमदार गावितांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता, शहरातून भंडारदरा चौक,वासुदेव चौक, मायाबाजार, कृषी उत्पन्न बाजार सामिर्ती मार्गे भाजपा सरकार विरोधात विविध घोषणाबाजी करत घोटी पोलीस ठाण्यात मोर्चाची सांगता झाली यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते भाववाढीच्या निषेधाचे फलक घेत भर उनातान्हात सहभागी झाले होते.

पोलीस ठाणे आवारात मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाल्यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आमदार गावितांनी भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकडून टीका करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन इगतपुरी तहसीलदार अनिल पुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्याकडे सुपूर्द केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक खोळंबा झाला होता. मात्र, पोलिसांनी तत्काळ वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कचरू पा. डुकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, जेष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब वालझाडे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, उपाध्यक्ष संजय तिवडे, युवा नेते भास्कर गुंजाळ, शहराध्यक्ष गोपाळ भगत, सचिन मते, बाळासाहेब कुकडे, राजेंद्र पा. जाधव, गुलाब वाजे, साहेबराव धोंगडे, तात्यापाटील भागडे, मच्छिंद्र दोंदे, विजय कडू, कैलास लकारे, भिका शिंदे, मतीन शेख, ज्ञानेश्वर खातळे, गोरख वाजे, दशरथ पागेरे, ज्ञानेश्वर कडू आदी पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com