BJP Corporators on Konkan Tour
BJP Corporators on Konkan Tour

भाजपच्या महापौर उमेदवारीसाठी नगरसेवक फोडण्याचा निकष?

महापालिकेत भाजपकडे नगरसेवकांचे सर्वाधीक संख्याबळ आहे. मात्र त्यांचे आठ ते नगरसेवक संपर्कात नाहीत. त्यामुळे महापौरपदाचा उमेदवार कसा व कोण ठरवावा यासाठी नेत्याची नगरसेवकांशी खलबते सुरु आहेत. या स्थितीत मलाच उमेदवारी द्या, कारण माझे विरोधी पक्षांतील नगरसेवकांशी संपर्क आहे. थोडक्‍यात मी विरोधी नगरसेवकांतही लोकप्रिय आहे, असे दावे इच्छुकांकडून केले जात आहेत. त्यामुळे सहलीला असलेल्या भाजप नगरसेवकांत तो चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.

नाशिक : महापालिकेत भाजपकडे नगरसेवकांचे सर्वाधीक संख्याबळ आहे. मात्र त्यांचे आठ ते नगरसेवक संपर्कात नाहीत. त्यामुळे महापौरपदाचा उमेदवार कसा व कोण ठरवावा यासाठी नेत्याची नगरसेवकांशी खलबते सुरु आहेत. या स्थितीत मलाच उमेदवारी द्या, कारण माझे विरोधी पक्षांतील नगरसेवकांशी संपर्क आहे. थोडक्‍यात मी विरोधी नगरसेवकांतही लोकप्रिय आहे, असे दावे इच्छुकांकडून केले जात आहेत. त्यामुळे सहलीला असलेल्या भाजप नगरसेवकांत तो चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.

नाशिकच्या सोळाव्या महापौरपदी कोणाला बसवायचे, याचा निर्णय गोव्यात भारतीय जनता पक्ष नगरसेवकांच्या बैठकीत होणार आहे. दरम्यान, भाजपमध्ये महापौरपदासाठी जोरदार 'लॉबिंग' सुरू झाले आहे. दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके, स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांच्यात जोरदार चुरस आहे. चौघांच्या नावावर एकमत न झाल्यास ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांचे नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे.

उपमहापौरपदासाठी महिलेला संधी मिळावी म्हणून भाजपच्या महिला नगरसेविका सरसावल्या असून, संगीता गायकवाड यांच्या नावासाठी बैठकीत आग्रह धरला जात आहे. यामध्ये दिनकर पाटील यांचे सर्वात पुढे आहे. मात्र पक्षशीस्त मोडण्यात अन्‌ सहकारी नगरसेवकांशी खाष्ट वागणुक यामुळे काही नगरसेवकच नव्हे तर नेतेही त्यांच्याविषयी सावध बोलतात.

असे असले तरी विरोधकांची जमवा जमव लक्षात घेता त्यांच्यात फूट पाडणे आपणच करु शकतो, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहे. अन्य इच्छुकांतही सध्या विरोधी गटातील नगरेसवकांशी आमचा कसा संपर्क आहे.... विरोधी गटातील किती नगरसेवकांशी आपला स्नेह आहे.... हा स्नेह समर्थन किंवा अप्रत्यक्ष मदतीत कसा परावर्तीत होईल.... आमच्याकडे कसे बाहुबळ आहे....आदी दावे केले जात आहेत.

या दाव्यांनी नेतेही चक्रावले आहेत. मात्र फाटाफुटीची भिती असल्याने या पात्रतेकडे नेतेही पुर्णत: दुर्लक्ष करु शकत नाहीत. याची जाणीव इच्छुकांनाही झाल्याने ते असे दावे जोमात करत असल्याचे सहलीला गेलेल्या काहींचे म्हणणे आहे. 

माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक नगरसेवकांच्या भूमिकेमुळे महापालिकेतील भाजपचे सत्ताकारण अडचणीत आले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर गोवा सहलीवर भाजपचे नगरसेवक पाठविण्यात आले. भाजपला बहुमत मिळण्याचा विश्‍वास निर्माण झाल्यानंतर आता महापौरपदाचा उमेदवार कोण, याचा शोध सुरू झाला असून, सर्वसाधारण गटासाठी महापौरपद खुले झाल्याने इच्छुकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे.

महापौरपदासाठी दिनकर पाटील यांच्यासह उद्धव निमसे, हिमगौरी आडके, शिवाजी गांगुर्डे, शशिकांत जाधव, मुकेश शहाणे, गणेश गिते, अलका अहिरे, अरुण पवार, संभाजी मोरुस्कर इच्छुक आहेत. परंतु दिनकर पाटील, हिमगौरी आडके, शिवाजी गांगुर्डे यांच्यात चुरस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com