सकल मराठा समाज सावध; संघटनांचे कार्यकर्ते मुंबईला रवाना 

मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक आज विधीमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाचे पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. विधेयकातील आरक्षणाच्या तरतुदीनंतरच प्रतिक्रीया व्यक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्ते मात्र आज सकाळी मुंबईला रवाना झाले आहेत.
सकल मराठा समाज सावध; संघटनांचे कार्यकर्ते मुंबईला रवाना 

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक आज विधीमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाचे पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. विधेयकातील आरक्षणाच्या तरतुदीनंतरच प्रतिक्रीया व्यक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्ते मात्र आज सकाळी मुंबईला रवाना झाले आहेत. 

मराठा समाजाला आरक्षणाचे विधेयक आणि त्याची प्रक्रिया यावरुन विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांत सातत्याने डावपेच सुरु आहेत. या प्रश्‍नावरुन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर होणारा कालापव्यय लक्षात घेता सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयावर सावध भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण व त्यातील तरतुदी पुढे येत नाहीत तोवर संयम ठेवला जाईल. प्रत्यक्ष आरक्षणाच्या कार्यवाहीनंतरच प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येईल अशी भूमिका येथील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. नाशिक, मुंबई महामार्गावरील गरवारे पॉंईंट येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. मराठा आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतुन परतणार नाही असे त्यांनी सांगितले. करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप आदींसह मोठ्या संख्येने विविध कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com