Nashik Leopard Captured by Forest Department | Sarkarnama

शिंदेच्या सरपंच माधुरी तुंगारांच्या मळ्याचा लळा लागलेला बिबट्या महिनाभराने जेरबंद 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 19 जून 2019

पुणे महामार्गावरील गजबजलेल्या शिंदे (ता. नाशिक) च्या सरपंच माधुरी तुंगार यांच्या मळ्यात रेंगाळणारा बिबट्या महिनाभराने पिंजऱ्यात अडकला आहे. दोन महिन्यांपासून मळ्यात येणाऱ्या बिबट्याने पाळलेल्या कुत्र्यासह अनेक प्राण्यांचा फडशा पाडला होता. बिबट्याच्या दहशतीतून ग्रामस्थांची सुटका करण्यासाठी सरपंच माधुरी तुंगार व त्यांचे कुटुंबीय महिन्याभरापासून जागरण करुन त्याला पिटाळून लावत होते. अखेर काल रात्री तो पिंजऱ्यात जेरबंद झाला. 

नाशिक : पुणे महामार्गावरील गजबजलेल्या शिंदे (ता. नाशिक) च्या सरपंच माधुरी तुंगार यांच्या मळ्यात रेंगाळणारा बिबट्या महिनाभराने पिंजऱ्यात अडकला आहे. दोन महिन्यांपासून मळ्यात येणाऱ्या बिबट्याने पाळलेल्या कुत्र्यासह अनेक प्राण्यांचा फडशा पाडला होता. बिबट्याच्या दहशतीतून ग्रामस्थांची सुटका करण्यासाठी सरपंच माधुरी तुंगार व त्यांचे कुटुंबीय महिन्याभरापासून जागरण करुन त्याला पिटाळून लावत होते. अखेर काल रात्री तो पिंजऱ्यात जेरबंद झाला. 

दारणा नदी व पुणे महामार्गाच्या मध्ये असलेले हे गाव अत्यंत गजबजलेले असते. हे नाशिक तालुक्‍याच्या राजकारणाचे केंद्र आहे. विविध राजकीय नेते, व्यापारी, शेतकऱ्यांचा येथे मोठा वावर असतो. मात्र अंधार होताच या बिबट्याचा या भागात मुक्त संचार असल्याने रात्री उशीरापर्यंत रंगणाऱ्या बैठका, कार्यक्रम देखील बंद करावे लागले होते. बिबट्याच्या अनेक लीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. स्वतः सरपंच तुंगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही गेल काही दिवस स्वतः जागरण करीत त्यांचे गडी लक्ष्मण पवार यांनी त्याला गेल्या आठवड्यात पिटाळून लावले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी येथे मुक्कामास आलेल्या मेंढपाळांनीही बिबट्याला हाकलून लावले होते.

बिबट्याच्या भितीने ग्रामस्थांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडणे बंद केले होते. परिसरात दहशत पसरवणारा हा बिबट्या मार्गात पिंजरा लावूनही चतुराईमुळे त्यात कधी अडकत नव्हता. ही दहशत कमी करण्यासाठी सरपंच व त्यांचे कुटुंबीय त्याची दहशत कमी करण्यासाठी स्वतः जागरण करीत होत्या. दारणा पट्ट्यातील सिन्नर फाटा, एकलहरे, सामनगाव, जाखोरी, हिंगणवेढे, चांदगिरी, शिंदे, पळसे, मानाणेगाव, चेहेडी, भगूर, देवळाली कॅम्प, वडनेर दुमाला, आर्टिलरी सेंटर या भागात बिबट्याचा कायम वावर असतो. त्यामुळे येथील शेतकरी कायम बिबट्याच्या दहशतीच्या वातावरणात वावरताना दिसतात. 

या बिबट्यासाठी सरपंच माधुरी तुंगार यांच्या उसाच्या शेतात पिंजरा उभारला होता. मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून बिबट्याला ताब्यात घेतले. दोन महिन्यांपासून शिंदे गाव शिवारात बिबट्याचा संचार आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तुंगार यांच्या शेतात पिंजरा उभारला होता. लक्ष्मण पवार त्यांच्या घराजवळ उभे होते. त्या वेळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत तातडीने आजूबाजूच्या नागरिकांना कळविले. वन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत बिबट्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. एक बिबट्या मंगळवारी जेरबंद झाला असला, तरी बिबट्याची दहशत कायम आहे. जखोरी, शिंदे, पळसे, एकलहरे, सामनगाव, नानेगाव या दारणा पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी आमच्या बंगल्याच्या आवारातील टॉमी नावाच्या कुत्र्याला बिबट्याने भक्ष्य केले होते. एक बिबट्या जेरबंद झाला असला, तरी अजूनही इतर वसाहतीमध्ये बिबट्याचा संचार आहे. -माधुरी तुंगार, सरपंच, शिंदे गाव. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख