Nashik Leader re-entered NCP in Presence of Chagan Bhujbal | Sarkarnama

भाजपचे माणिकराव कोकाटे २० वर्षांचे वर्तुळ पुर्ण करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षातर्फे ते विधानसभेची उमेदवारी करणार आहेत. या निमित्ताने कोकाटे यांनी विविध पक्षांचे झेंडे घेत वीस वर्षांत राष्ट्रवादी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस असे वर्तुळ पुर्ण केले आहे. राजकीय पक्षाऐवजी गटांभोवती फिरणारे राजकारण असलेल्या सिन्नरमध्ये यंदा शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्याशी कोकाटे असे लढतीचे चित्र आहे.

नाशिक : सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षातर्फे ते विधानसभेची उमेदवारी करणार आहेत. या निमित्ताने कोकाटे यांनी विविध पक्षांचे झेंडे घेत वीस वर्षांत राष्ट्रवादी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस असे वर्तुळ पुर्ण केले आहे. राजकीय पक्षाऐवजी गटांभोवती फिरणारे राजकारण असलेल्या सिन्नरमध्ये यंदा शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्याशी कोकाटे असे लढतीचे चित्र आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांसह प्रमुख नेते उपस्थित होते.  कोकाटे यांच्या समवेत सिन्नर तालुकय्तीाल विविध समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकाटे यांना सिन्नर मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नते अॅड भगीरथ शिंदे, माजी खासदार देवीदास पिंगळे, चंद्रकांत वरंदळ, डाॅ. झाकीर शेख, कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थित होते. 

कोकाटे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांना १,३४,२९९ मते मिळाली होती. यामध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांना सर्वाधीक ९१,११४ मते मिळाली होती. नुकतेच त्यांची कन्या सिमांतिनी काकोटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक अटीतटीची होईल अशी चिन्हे आहेत.

श्री कोकाटे मुळ कॉंग्रेस पक्षाचे आहेत. १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाल्यावर या पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाने सिन्नरची उमेदवारी तुकाराम दिघोळे यांना दिली. त्यामुळे कोकाटे यांनी एका रात्रीत शिवसेनेत प्रवेश करीत ते आमदार झाले. त्यानंतर २००४ मध्येही ते शिवसेनेतर्फे निवडणूक जिंकले. मात्र, माजी उपमुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समवेत त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. २००९ मध्ये ते कॉंग्रेसतर्फे उमेदवारी करुन आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी कॉंग्रेसचा त्याग करुन भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये भाजपतर्फे उमेदवारी केल्यावर त्यांचा पराभव झाला. अशा पध्दतीने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप आणि पुन्हा राष्ट्रवादी असे पक्षांतराचे वर्तुळ पुर्ण करीत ते आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख