पोलिस उपनिरिक्षक छाया देवरेंनी एकाच दिवसात २६ टवाळखोरांना शिकवला धडा

निर्भया पथकाच्या वतीने सिडको परिसरातील रोडरोमिओंचा चांगला समाचार घेतल्याचे दिसून आले. या पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक छाया देवरे यांच्या टीमने संपूर्ण सिडको परिसरातील तब्बल २६ टवाळखोर मुलांना तोंडी समज देऊन सोडले. निर्भया पथक येताच सिडकोतील महत्त्वाच्या ठिकाणी असलेले घोळका करून बसलेल्या तसेच मुलींच्या छेडछाडीच्या उद्देशाने निदर्शनास आलेल्या रोडरोमिओंचा निर्भया पथकाने चांगलाच समाचार घेतला.
पोलिस उपनिरिक्षक छाया देवरेंनी एकाच दिवसात २६ टवाळखोरांना शिकवला धडा

नाशिक : सिडको परिसरात निर्भया पथकाद्वारे उत्तम कामगिरी करणाऱ्यापोलीस उपनिरीक्षक लेडी सिंघम छाया देवरे अर्थात यांनी टवाळखोरांविरोधात उघडलेल्या मोहिमेची चांगलीच चर्चा आहे. त्या ज्या भागात, महाविद्यालयाकडे जातात तिथे रोड रोमिओंची पळापळ होते. मंगळवारी देवरे यांनी एकाच दिवसात सव्वीस टवाळखोरांवर कारवाई करीत त्यांची झाडाझडती घेतल्याने टवाळखोरांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे.

निर्भया पथकाच्या वतीने सिडको परिसरातील रोडरोमिओंचा चांगला समाचार घेतल्याचे दिसून आले. या पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक छाया देवरे यांच्या टीमने संपूर्ण सिडको परिसरातील तब्बल २६  टवाळखोर मुलांना तोंडी समज देऊन सोडले. निर्भया पथक येताच सिडकोतील महत्त्वाच्या ठिकाणी असलेले घोळका करून बसलेल्या तसेच मुलींच्या छेडछाडीच्या उद्देशाने निदर्शनास आलेल्या रोडरोमिओंचा निर्भया पथकाने चांगलाच समाचार घेतला. या दरम्यान संबंधितांचे नांव व मोबाईल क्रमांक घेवून सोडण्यात आले. महाविद्यालयीन करिअरचा विचार करून त्यांना समज देऊन सोडण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक छाया देवरे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने टवाळखोरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम झपाट्याने हाती घेतले आहे. पोलीस गाडीचा कुठल्या प्रकारे सायरन न वाजवता अतिशय शांत व छुप्या पद्धतीने साध्या वेशामध्ये ही कारवाई करत असल्याचे परिसरात विविध ठिकाणी बघायला मिळत आहे. यामुळे टवाळखोरामध्ये निर्भया पथकाची दहशत यानिमित्ताने दिसून येत आहे. यामुळे महिला व शालेय विद्यार्थिनींमध्ये निर्भय वातावरण दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या महाविद्यालय परिसरात अतिशय तणावाचे वातावरण दिसून येत होते. किरकोळ कारणावरून भांडणे होण्याचे प्रकार निदर्शनास येत होते. या सर्व प्रकारावर आळा घालत अतिशय नियोजन पद्धतीने निर्भया पथकाचे काम नागरिकांना दिसून येत आहे.

हे देखिल वाचा - 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com