चिंचा विकणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात PSI होऊन मुलीने पेरला गोडवा - Nashik Girl Farhanaz Patel Brings Happiness to Family By Becoming PSI | Politics Marathi News - Sarkarnama

चिंचा विकणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात PSI होऊन मुलीने पेरला गोडवा

हर्षल गांगुर्डे
गुरुवार, 19 मार्च 2020

गणुर (ता. चांदवड) येथील फरहनाज पटेल या चिंचा विकणाऱ्या वडिलांच्या 'हिरकणी'ने घरीच अभ्यास करुन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. इतकंच नव्हे तर राज्यात मुलींमध्ये सहावे येऊन रोजच आंबट चिंचात रमणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात आनंदाचा गोडवा पेरला आहेगणुर (ता. चांदवड) येथील फरहनाज पटेल या चिंचा विकणाऱ्या वडिलांच्या 'हिरकणी'ने घरीच अभ्यास करुन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. इतकंच नव्हे तर राज्यात मुलींमध्ये सहावे येऊन रोजच आंबट चिंचात रमणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात आनंदाचा गोडवा पेरला आहे

चांदवड : स्पर्धा परीक्षा म्हटलं की, पहिलं नाव येतं ते मुंबई, पुण्यासारख्या शहरांचं. तेथील क्‍लासेसचं. ग्रामीण भागातून या शहरांत पुण्यात जाणं, महागडे क्‍लास हा यशाचा चाकोरीबद्ध ट्रेंड मोडणं अशक्‍यच असते. मात्र गणुर (ता. चांदवड) येथील फरहनाज पटेल या चिंचा विकणाऱ्या वडिलांच्या 'हिरकणी'ने घरीच अभ्यास करुन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. इतकंच नव्हे तर राज्यात मुलींमध्ये सहावे येऊन रोजच आंबट चिंचात रमणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात आनंदाचा गोडवा पेरला आहे.

पोलिस उपनिरीक्षक पदासाठी २०१८ मध्ये परिक्षेत तिने हे यश मिळविले आहे. फराहनाज पटेल हिचा जन्म चांदवड सारख्या दुष्काळी तालुक्‍यातला. हंगामी शेती अन चिंचा विक्री करणे वडील अनिस पटेल यांचा व्यवसाय. तीन मुली आणि दोन मुलांच्या शिक्षणासाठी पैसा पुरवताना आई-वडिलांची नेहमीच फरफट व्हायची. अशा परिस्थितीत दहावीपर्यंत गावच्या शाळेत शिक्षण नंतर बारावी ते पदवी पर्यंत चांदवड येथे शिक्षण केले.

दरम्यानच्या काळात वडील चिंचा विक्री करायचे, घरात इतर भावंडे इम्रान, रुकसार, गुलशन या सर्वांचेच शिक्षण सुरू असल्याने आर्थिक अडचणी नित्याच्याच होत्या. शाळेत असताना स्काऊट-गाईड ची परेड व्यवस्थित करत नसल्याचे सांगून फराहनाजला बाहेर काढण्यात आलं होतं. तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधून शिस्तीला महत्व असलेल्या पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न बघितलं. मुलीला शिकवून काय करणार अशा समाजातील अनेकांच्या प्रश्नाला तिनं आपल्या यशातून उत्तर दिलंय. फराहनाज चा मोठा भाऊ इम्रानची देखील विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली असून आपल्या यशाचे श्रेय ती आई-वडील, भाऊ, मामा-मामी आणि बहिणींना देते.

वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान फक्त फराहनाजलाच नसून अवघ्या तालुक्‍यासाठी ती चर्चेचा विषय ठरत आहे शिवाय गणुर गावातील पहिलीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून मानही तिने पटकावला आहे. या परिक्षेतील तिचे यश सबंध तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरले आहे. अन्य मुलींनीही याच वाटेने जावे, वाटेत अडथळे, अडचणी असल्या तरी त्यावर मात करता येते. आपण देखील स्थीर झाल्यावर अन्य मुलींना त्यासाठी प्रोत्साहन देऊ, असं फरहनाजला वाटते. त्यासाठी आपण इतरांना मदत व दिशा दाखवण्याचे काम करत राहणार असल्याचे तिने सांगीतले.

सातत्य राखल्याने यशस्वी

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतांना सातत्य गोष्टीस ठेवले. या सर्व प्रक्रियेत कुटुंबासह मित्र परिवाराचे मोठे सहकार्य लाभले. यापुढे स्पर्धा परीक्षांचा हा प्रवास इथेच थांबवणार नसून माझ्यासारख्या अनेक मुलींनी सेवेत यावे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे -फराहनाज पटेल, पोलीस उपनिरीक्षक
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख