nashik farmer | Sarkarnama

नाशिकमध्ये दोन शेतकऱ्यांची आत्महत्या 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नाशिक :  जिल्ह्यात आज आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या बागाईती क्षेत्रात गेल्या शंभर दिवसांत एकवीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याने मराठवाड्या पाठोपाठ हा विषय चर्चेचा बनला आहे. शासनाच्या धोरणातून कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या समस्यांनी ही नैराश्‍याची ही सामाजिक घुसळण राजकीय पटलावरही चिंतेचा विषय बनला आहे. 

बागायती व डाळिंब, उसाचे अफाट पीक होणाऱ्या कळवण या प्रगत मात्र आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 
भाऊसाहेब चंद्राजी बंगाळे (40) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर नवी बेज भागात ताराचंद रामभाऊ बागूल यांनी सकाळी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे क्षेत्र 1 एकराहून कमी होते. त्यांना 70 क्विंटल कांदे उत्पन्न मिळाले मात्र अपेक्षित भाव नसल्याने उत्पादन खर्चही सुटू शकला नाही. त्यामुळे काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यातच शेतकरी प्रश्‍नावरील चर्चा व राजकीय पटलावरील निराशाजनक चित्र यातून त्यांना दिलासा मिळण्याऐवजी चित्र विदारक होते. त्यांनी काही सहकाऱ्यांशी चर्चेत ही भावना व्यक्त केली होती अशी प्राथमिक माहितीत पुढे आली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. 

द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाला आणि आदिवासींची स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर व प्रगत शेतीचा अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून नाशिकचा आवर्जून उल्लेख केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांत येथील सर्व पिकांची अर्थकारण बाधित झाले आहे. विशेषतः कांदा शेतकऱ्यांना रडवतोय व त्यावर सत्ताधारी उपाययोजनांऐवजी स्मित हास्य करीत लवकरच उपाययोजना करु अशी वेळ मारुन नेत असल्याने शेतकऱ्यांतील निराशा वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे लोण नाशिकला पोहोचल्याने यावरुन उन्हाच्या काहिलीत राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत. 
................................. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख