97 कोटींच्या शिक्षण मंडळाच्या सभापती संगीता गायकवाड गिरवाताहेत मुक्त विद्यापीठात धडे

भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचीत सभापती संगीता गायकवाड मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थीनी आहेत. पहिल्यांदा मनसे आणि त्यानंतर भाजपकडून त्या दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा पुढाकार असतो
Nashik Education Board Chairman Sangita Gaikwad Studying BA
Nashik Education Board Chairman Sangita Gaikwad Studying BA

नाशिक रोड : महापालिका शिक्षण मंडळाच्या 90 शाळा, 927 शिक्षक, 31 हजार विद्यार्थी आणि 97 कोटींचे अंदाजपत्रक आहे. या मंडळाच्या नवनिर्वाचीत सभापती भाजपच्या संगीता गायकवाड मात्र 'विद्यार्थी' आहेत. त्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या साने गुरुजी केंद्रात 'बीए'चे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा हा गाडा हाकण्याची जबाबदारी एक 'विद्यार्थिनी' कशी पार पाडणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचीत सभापती संगीता गायकवाड मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थीनी आहेत. पहिल्यांदा मनसे आणि त्यानंतर भाजपकडून त्या दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा पुढाकार असतो. टवाळखोरांना जरब बसावी यासाठी महाविद्यालयीन परिसरात त्यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शिखर स्वामीनी संस्थेतर्फे महिला स्वयंसेवकांसोबत त्या वाहतूक नियमांविषयी जागृती करतात. धोंगडे मळा भागात अभ्यासिका चालवितात. असे अनेक उपक्रम त्या करतात. 

नाशिक शिक्षण मंडळाकडून प्रती विद्यार्थी दरवर्षी 31 हजार रुपये खर्च केले जातात. हा खर्च नावाजलेल्या संस्थांच्या विद्यार्थ्यांचाही नाही. यातून त्यांना सभापतीपदाचा अनुभव समृद्ध करतो की त्यांनी घेतलेला राजकारण, समाजकारण, आयुष्याचा अनुभव त्या शिक्षण मंडळाचा कारभार हाकण्यासाठी उपयुक्त ठरतो हे आगामी काळच ठरवील.

लोकप्रतिनिधी सक्षम असावा अशी सामाजिक भावना सध्या समाजात रूढ आहे. कुटुंब शिक्षित असल्यावर मुले शिक्षित होतात. पर्यायाने समाज शिक्षित होतो. शिक्षण मंडळ सभापती निवडीत नासिक रोडच्या नगरसेविका संगीता हेमंत गायकवाड या महाविद्यालयीन शिक्षण सध्या पूर्ण करीत आहेत. त्या सध्या बीए च्या तृतीय वर्षाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभ्यास केंद्रावर शिक्षण पूर्ण करीत आहेत. 

सभापती होण्याआधी अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. सौ गायकवाड केवळ सातवी पास आहेत असाही प्रचार विरोधीक करीत होते. विहितगावचे फडोळ हे माहेर असलेल्या गायकवाड यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण विहितगावच्या न्यू इंग्लीश स्कूलमध्ये झाले आहे. सहावी ते दहावी पर्यंत कन्या शाळेत, अकरावी व बारावी आरंभ महाविद्यालयात शिक्षण झाले. सध्या त्या मुक्त विद्यापीठात घरूनच तृतीय वर्ष बीए चे शिक्षण घेत आहेत. 

येत्या मे महिन्यात त्या परीक्षेला सामोरे जातील. शिक्षण मंडळाची गुणवत्ता उंचावण्याचा ध्यास घेतलेल्या संगीता गायकवाड सध्या स्वतःची गुणवत्ताही उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकप्रतिनिधी शिकलेला असला तर तो समाजाला शिकवून शिक्षित समाजाचे सुयोग्य प्रतिनिधित्व करतो. बारावी नंतर विवाह झाल्याने सध्या त्या अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करीत आहेत. त्यांच्या या शिक्षणाचा शिक्षण मंडळाला नक्कीच हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com