नाशिक पूर्व मतदारसंघाला मिळेल राहुल ढिकलेंचे नवे नेतृत्व : रंजना भानसी

''पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आता या मतदारसंघाला नवीन नेतृत्वाची आस लागली आहे. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांमधील विकासकामे, राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली कामे या बळावर मतदारांचा मोठा पाठींबा आहे. त्यामुळे या मतदारसंघाला आता अॅड. राहुल ढिकले यांचे नवे नेतृत्व लाभेल,'' असा विश्‍वास महापौर रंजना भानसी यांनी येथे व्यक्त केला.
Ranjana Bhanasi - Rahul Dhikale
Ranjana Bhanasi - Rahul Dhikale

नाशिक : ''पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आता या मतदारसंघाला नवीन नेतृत्वाची आस लागली आहे. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांमधील विकासकामे, राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली कामे या बळावर मतदारांचा मोठा पाठींबा आहे. त्यामुळे या मतदारसंघाला आता अॅड. राहुल ढिकले यांचे नवे नेतृत्व लाभेल,'' असा विश्‍वास महापौर रंजना भानसी यांनी येथे व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अॅड ढिकले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी जय शंकर लॉन्स येथे मतदारसंघातील भाजप- शिवसेना महायुतीच्या प्रचारासाठी स्थानिक नागरिकांची बैठक झाली. यावेळी त्या म्हणाल्या, ''माजी आमदार (कै) उत्तमराव ढिकले यांनी या भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवली. या बळावर महायुतीचे उमेदवार अॅड. राहुल ढिकले हे विजयी होतील. राज्य शासनाने विकासकामांच्या माध्यमातून राज्याला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे. नाशिक शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले. त्यांच्या दूरदृष्टीतून विविध प्रकल्पांची कामे अतिशय जोमाने सुरु आहेत. त्याचा लाभ निश्‍चितच नागीरकांचे दैनंदिन जीवन सुसह्य होण्यासाठी होईल. त्यामुळे भाजप- सेनेच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे.'' कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन महापौर भानसी यांनी केले.

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, चिटणीस लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, पवन भगूरकर, शहर संघटक प्रशांत जाधव, शिवाजी निमसे, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, दिनकर आढाव, अरुण पवार, शिवाजी भोर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com