विधानसभा २०१९ : नाशिक पूर्वमध्ये महाजन - सानप मतभेदांमुळे भाजमधले इच्छुक वाढले

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून तब्बल पाऊण लाखांचे मताधिक्‍य मिळाल्याने या ठिकाणाहून भाजप-शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सन 2009 मध्ये पुर्व विधानसभा मतदारसंघ या नव्या मतदारसंघाची घोषणा झाली पहिल्याचं निवडणुकीत मनसेचे कै. अॅड. उत्तम ढिकले निवडून आले होते.
Girish Mahajan - Balasaheb Sanap
Girish Mahajan - Balasaheb Sanap

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून तब्बल पाऊण लाखांचे मताधिक्‍य मिळाल्याने या ठिकाणाहून भाजप-शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सन 2009 मध्ये पुर्व विधानसभा मतदारसंघ या नव्या मतदारसंघाची घोषणा झाली पहिल्याचं निवडणुकीत मनसेचे कै. अॅड. उत्तम ढिकले निवडून आले होते. 

त्यानंतर भाजपचे बाळासाहेब सानप निवडून आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 'पूर्व'मधून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना पाऊण लाखांचे मोठे मताधिक्‍य मिळाल्याने भाजपसह शिवसेनेतील इच्छुकांची संख्या वाढली.  सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेनेसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीतही आघाडी न झाल्याने सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. मात्र, भाजपच्या सानप यांनी शिवसेनेचे सूर्यकांत लवटे यांच्यासह कॉंग्रेसचे उद्धव निमसे, राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे यांच्यावर मात करत तब्बल 78 हजार 554 मते घेतली होती. 

          उद्धव निमसे                       राहुल ढिकले

पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार सानप यांच्यातील कथित मतभेदाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी विधानसभेसाठी भाजपमध्ये उद्धव निमसे, अरुण पवार, सुनील आडके, संभाजी मोरुस्कर अशी इच्छुकांची फळीच उभी राहिली आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा संभाव्य महाआघाडीची मोठी चर्चा आहे. महाआघाडीतर्फे मनसेचे माजी आमदार (कै.) उत्तमराव ढिकले यांचे पुत्र अॅड. राहुल ढिकले प्रबळ दावेदार आहे. 

पक्षनिहाय इच्छुक
भाजप : विद्यमान आमदार बाळासाहेब सानप, अरुण पवार, सुनील आडके, गणेश गिते, संभाजी मोरुस्कर.
शिवसेना : दत्ता गायकवाड, चंद्रकांत लवटे
कॉंग्रेस : डॉ. शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, राहुल दिवे
राष्ट्रवादी : निवृत्ती अरिंगळे, 
मनसे आघाडी : अॅड. राहुल ढिकले
वंचित बहुजन आघाडी : पवन पवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com