Nashik BJP Aspirants Hoarding at Modi's Public Meeting Venue
Nashik BJP Aspirants Hoarding at Modi's Public Meeting Venue

मोदींच्या सभास्थळावरील फलकावर झळकले आमदार सानपांऐवजी इच्छुकांचे फोटो

शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरु आहे. ही सभा नाशिक पूर्व मतदारसंघात होत आहे. मात्र, या सभेच्या व्यासपीठाजवळ भाजप पदाधिकाऱ्याने लावलेल्या फलकावर स्थानिक आमदार बाळासाहेब सानप यांचे छायाचित्र गायब आहे. त्याऐवजी मतदारसंघातील इच्छुकांचे फोटो आहेत. त्यामुळे जाहीर सभेआधीच उमेदवारीवरुन राजकारण रंगले आहे.

नाशिक : शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरु आहे. ही सभा नाशिक पूर्व मतदारसंघात होत आहे. मात्र, या सभेच्या व्यासपीठाजवळ भाजप पदाधिकाऱ्याने लावलेल्या फलकावर स्थानिक आमदार बाळासाहेब सानप यांचे छायाचित्र गायब आहे. त्याऐवजी मतदारसंघातील इच्छुकांचे फोटो आहेत. त्यामुळे जाहीर सभेआधीच उमेदवारीवरुन राजकारण रंगले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पंचवटी भागात होत आहे. हा पक्षाचे विद्यमान आमदार सानप यांचा मतदारसंघ आहे. येथून त्यांनी महापालिकेत नगरसवेक म्हणून चार टर्म प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र सध्या पक्षात त्यांच्या विरोधात राजकारणचांगलेच तापले आहे. त्याच्या विरोधात सोळा जणांनी उमेदवारी मागितली आहे. पंचवटीचे माजी अध्यक्ष दिगंबर धुमाळ यांनी मोदींच्या सभेच्या व्यासपीठालगतच मोठे होर्डींग्ज लावले आहेत. त्यावर आमदार सानप यांचे छायाचित्रच नाही. 

हे देखिल वाचा

मात्र, पूर्व मतदारसंघातील इच्छुक असा ठळक उल्लेख करीत सुनिल बागूल, नगरसेवक उध्दव निमसे, अरुण पवार, सुनिल आडके, हेमंत धात्रक, नगरसेविका संगिता गायकवाड, दिनकर आढाव, कांचनताई खाडे, जगदीश गोडसे, कमलेश बोडके, सुनिल केदार, डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांची छायाचित्र आहेत. त्यामुळे या फलकावरुन विधानसभा निवडणुकीतील राजकारणाचे रंग प्रकट झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com