नाशिक पूर्व मध्ये ना आयात, ना विद्यमान, भाजपची उमेदवारी आम्हालाच! 

नाशिक पूर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडे डझनभर इच्छुक आहेत. यातील काहींना वर्षभरापूर्वीच उमेदवारीचे डोहाळे लागले होते. निवडणुका जवळ आल्याने सध्या या सर्वच इच्छुकांना हुरहुर लागली आहे. त्यामुळे हे सर्व इच्छुक एकत्र येत त्यांनी दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. ही भेट सध्या शहरातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच चर्चेची ठरली आहे.
Nashik East BJP Aspirants Meet Girish Mahajan
Nashik East BJP Aspirants Meet Girish Mahajan

नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. यंदा येथील गणिते बदलली आहेत. आयात उमेदवाराला महिन्यापूर्वीच प्रवेश नाकारला आहे. विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांच्या बऱ्याच गोष्टी वरिष्ठांना रुचलेल्या नाहीत. त्यामुळे 'ना आयात, ना विद्यमान उमेदवारी केवळ आमच्यापैकीच एकाला,' असा दावा भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांनी केला आहे. त्यामुळे शहरात भाजपच नेते, पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. 

या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडे डझनभर इच्छुक आहेत. यातील काहींना वर्षभरापूर्वीच उमेदवारीचे डोहाळे लागले होते. निवडणुका जवळ आल्याने सध्या या सर्वच इच्छुकांना हुरहुर लागली आहे. त्यामुळे हे सर्व इच्छुक एकत्र येत त्यांनी दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. ही भेट सध्या शहरातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच चर्चेची ठरली आहे.

जलसंपदा मंत्री महाजन यांच्याशी अतिशय सविस्तर, सखोल व तासभर चर्चा झाली. खासगीतही चर्चा झाली. शहरातील आमदारांच्या सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत. यातील अनेक विषय वरिष्ठांना नापसंत आहेत. त्यामुळे विद्यमान उमेदवाराऐवजी पक्षातील अन्य निष्ठावंतांचा विचार होईल असे आश्‍वासन महाजन यांनी दिले आहे. या भागात चव्वेचाळीस पैकी अडतीस नगरसेवक भाजपचे आहेत. या भागात पक्षाचे कान तळागाळात रुजलेले आहे. त्यामुळे अन्य पक्षातील इच्छुकांचा विचार होण्याची शक्‍यता नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांना महिनाभरापूर्वीच नकार देण्यात आल्याचे या नेत्यांनी सांगीतले. 

भाजपचे सुनिल आडके, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागूल, वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत धात्रक, माजी नगरसेवक अरुण पवार, महापालिका स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, सुनिल केदार यांसह विविध इच्छुक, पदाधिकाऱ्यांनी ही भेट घेतली. त्यामुळे या भेटीनंतर शहरात भाजपच्या समर्थकांत खळबळ उडाली आहे. या भेटीला राजकीय दृष्ट्या महत्व दिले जात असल्याने नक्की उमेदवारी कोणाला? याची उत्सुकता आहे. या मतदारसंघात भाजपकडे डझनभर इच्छुक आहेत. यातील अनेकांना वर्षभरापूर्वीच उमेदवारीचे डोहाळे लागले होते. त्यामुळे प्रत्येकाने जोरदार तयारी केली आहे. विद्यमान आमदार बाळासाहेब सानप मात्र मतदारसंघात सक्रीय असून त्यांनी या वावड्यांकडे दुर्लक्ष केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com