नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात इच्छुकांमध्येच रस्सीखेच !

Rahul_Dhikle_Balasaheb_Sanap
Rahul_Dhikle_Balasaheb_Sanap

नाशिक : कुंभमेळ्याची नगरी अशी नाशिकची खास ओळख ! पंचवटी गोदावरी नदीकाठचा परिसर ज्याची जगभर चर्चा होते, तोच भाग नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मोडतो. महाराष्ट्रातील नाशिक पूर्व हा मतदारसंघ फेररचनेनंतर आस्तित्वात आलेला नाशिक शहरातील एक मतदारसंघ असून बाळासाहेब सानप हे सध्याचे नाशिक पूर्व विभागातील आमदार आहेत.

  या मतदारसंघात नाशिक शहर, ग्रामीण परिसर आणि नाशिक रोड औद्योगिक परिसरही आहे.साधारण ३ लाख १८ हजार लोकसंख्येचा हा मतदारसंघात कोणत्याही एका जातीच्या प्रभावात येत नसला तरी यामध्ये मराठा समाज तुलनेने अधीक आहे. पाठोपाठ दलित, वंजारी, गुजराथी समाजाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात तब्बल ६३ छोट्या, मोठ्या जातींचा या मतदारसंघात समावेश आहे.

इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या केंद्र सरकारच्या  महत्वाच्या आस्थापना याच मतदारसंघात असल्याने कामगार वस्तीलाही सामवून घेणारा मतदारसंघ आहे. धार्मिक, शेती आणि कामगार अशी या मतदार संघातील नागरिकांच्या अर्थकारणाची मुख्य चाकं आहेत. शहरातील तीन मतदारसंघापैकी विस्ताराने मोठा असणारा हा मतदारसंघ असून भाजपा शिवसेनेला मानंणारा मोठा वर्ग मतदार संघात आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून तब्बल पाऊण लाखांचे मताधिक्‍य मिळाल्याने या ठिकाणाहून भाजप-शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जर शिवसेना भाजप वेगवेगळे लढले तर भाजपकडून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांच्यासोबतच अरुण पवार, सुनील आडके, गणेश गिते, संभाजी मोरुस्कर तर शिवसेनेकडून दत्ता गायकवाड, चंद्रकांत लवटे ही नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत. 

सन 2014 च्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेनेसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीतही आघाडी न झाल्याने सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. मात्र, भाजपच्या सानप यांनी शिवसेनेचे सूर्यकांत लवटे यांच्यासह कॉंग्रेसचे उद्धव निमसे, राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे यांच्यावर मात करत तब्बल 78 हजार 554 मते घेतली होती.

 पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार सानप यांच्यातील कथित मतभेदाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीही निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. आणि वंचितकडून पवन पवार निवडणुकीस उभे राहण्याची  शक्यता आहे. 

या मतदारसंघातून कॉंग्रेसकडून डॉ. शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, राहुल दिवे , राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवृत्ती अरिंगळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऍड. राहुल ढिकले अशा संभाव्य महाआघाडीची मोठी चर्चा आहे. परंतु तरीही महाआघाडीतर्फे मनसेचे माजी आमदार (कै.) उत्तमराव ढिकले यांचे पुत्र ऍड. राहुल ढिकले प्रबळ दावेदार आहे. 

आता हे बघणे महत्वाचे ठरेल इतक्या सर्व इच्छुक उमेदवारांपैकी कोणाला आगामी विधानसभेचे तिकीट मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com