कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर भर द्या; नाशिक विभागीय आयुक्त - Nashik Divisional Commissioner Directs Tests of People in Contact with Corona Patients | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर भर द्या; नाशिक विभागीय आयुक्त

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 एप्रिल 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखाण्यासाठी  जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांनी कोरोनाग्रस्त रुग्णांची संपर्क साखळी शोधणे व संपर्कातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले आहेत

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखाण्यासाठी  जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांनी कोरोनाग्रस्त रुग्णांची संपर्क साखळी शोधणे व संपर्कातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले आहेत.

नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उपायुक्त रघुनाथ गावडे, दिलीप स्वामी, अर्जुन चिखले, संगिता धायगुडे, प्रतिभा संगमनेरे, आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.

भाजी विक्रेते, किराणा दुकानदारांचीही तपासणी हवी

प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांच्या दैनंदिन संपर्कात येणारे भाजी विक्रेते, दुध विक्रेते, मेडीकल व किराणा दुकानदार यांची देखील तपासणी करण्यात यावी. यामुळे अधिक प्रमाणात संसर्ग होणे टाळता येईल.  कोरोनाग्रस्त रुग्णांवर आदर्श पद्धतीनुसार उपचार करावे, ते संसर्गापासून लवकर मुक्त व्हावे  यासाठी रुग्णांची आवश्यक ती सर्व काळजी  घेवून योग्य उपाययोजना करण्यात याव्यात. वैद्यकिय साहित्य व औषधांची कमतरता भासू नये यासाठी नियोजन तयार ठेवावे. असे आदेश विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी दिले.

धुळे, नंदुरबारसह पाच जिल्ह्यांत विलीगीकरण कक्ष

नाशिक नगर धुळे, जळगाव नंदुरबार या पाचही जिल्ह्यात जिल्हा रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय तसेच खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती  यावेळी देण्यात आली. खाजगी रुग्णालयांमधील सुविधा, जिल्ह्यांमध्ये सुरू निर्वासीतांसाठीचे निवारा केंद्रांमधील राहण्याची व जेवणाची करण्यात आलेली व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण भागात पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, अंगणवाडी व त्यामार्फत पुरविण्यात येणारे मिड मिल, प्रधानमंत्री गरीब जनधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य, भारतीय डाक बँक, अन्नधान्य पुरवठा आदी व्यवस्था यांचा आढावा घेऊन आवश्यकता सूचना यावेळी विभागीय आयुक्तांनी  दिल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख