येवलेकरांनी 'बाहेरच्या' भुजबळांना मानले आपले!

लोकसभा निवडणुकीत येवला मतदारसंघात भाजपला 28 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अगदी घरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्व भुजबळ विरोधक एकत्र आले. त्यात छगन भुजबळ 'बाहेरचे' असा प्रचार केला. मात्र, छगन भुजबळ यांना विक्रमी 56 हजारांची आघाडी मिळून ते चौथ्यांदा विजयी झाले. याचा अन्वयार्थ सांगतो, येवल्याचे मतदार म्हणतात....गावातले नेते परके, छगन भुजबळ खरे आमचे!
Chagan Bhujbal - Sambhaji Pawar
Chagan Bhujbal - Sambhaji Pawar

येवला : लोकसभा निवडणुकीत येवला मतदारसंघात भाजपला 28 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अगदी घरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्व भुजबळ विरोधक एकत्र आले. त्यात छगन भुजबळ 'बाहेरचे' असा प्रचार केला. मात्र, छगन भुजबळ यांना विक्रमी 56 हजारांची आघाडी मिळून ते चौथ्यांदा विजयी झाले. याचा अन्वयार्थ सांगतो, येवल्याचे मतदार म्हणतात....गावातले नेते परके, छगन भुजबळ खरे आमचे!

येवल्याची निवडणूक यंदा शिवसेनेने प्रतिष्ठेचा मुद्दा केली होती. वर्षभर आधी त्यांनी संभाजी पवार यांची उमेदवारी घोषीत केली. मात्र खरा ट्‌वीस्ट आला तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माणिकराव शिंदे यांनी ''भुजबळांना मी आणले. यंदा मला उमेदवारी हवी'' ही फिरकी घेऊन. अगदी बारामतीहून मनधरणी झाल्यावरही त्यांनी दाद दिली नाही. शेवटच्या क्षणी ते विरोधकांना जाऊन मिळाले. थोडक्‍यात शिवसेनेचे नरेंद्र दराडे, किशोर दराडे हे दोन आमदार, मारोतराव पवार, कल्याणराव पाटील हे दोन माजी आमदार, माणिकराव शिंदे, रुपचंद भागवत हे दिग्गज नेते एकत्र आले होते.

आपआपल्या गटात थांबुन हाकारे दिले असते तरी पाहिजे ती शिकार ते करु शकले असते. त्यांचे भावनिक आवाहन होते 'स्थानिक हवा परका नको,' हाच सुर पकडत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तर भुजबळ यांना उद्देशुन 'हे पार्सल मुंबईला सुध्दा नको' असा शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागल्याने भुजबळ अधिक सावध होऊन लढले. त्यांना मिळालेले मतदान पाहता मतदारांनी फक्त विकासाला कौल दिला. त्यांचा सुर होता, 'छगन भुजबळ तेव्हढे आमचे, गावातले नेते सगळे निवडणुकीत परके'

पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत तालुक्‍याच्या 124 गावांतून युतीच्या डॉ. पवार यांना 11 हजार 126 मतांचे मताधिक्‍य, तर लासलगावमधील 47 गावांतून तब्बल 16 हजार 694 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या येवला शहरात 1800 मतांची आघाडी होती. ग्रामीण भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेच्या पाचपैकी तीन गटांत, तर पंचायत समितीच्या दहापैकी सात गटांत शिवसेनेचे सदस्य आहेत. असे असताना हे सर्व बुरूज ढासळले.

असे का? याचे उत्तर कोणाकडेच नाही. विशेषत: नगरसूल, राजापूर, मुखेड व पाटोदा या भागांत शिवसेनेचे चांगले वर्चस्व असताना एकाही गणात शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना मताधिक्‍य मिळाले नाही. भविष्यातील राजकारणासाठी ही निवडणूक शिवसेना आणि भाजपला सबुरीने घ्या, असा सल्ला देणारी ठरली आहे, हे नक्की!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com