नाशिकच्या 334 अल्पवयीन मुली बेपत्ता : 2702 महिलांचा लागेना शोध

नाशिकच्या 334 अल्पवयीन मुली बेपत्ता : 2702 महिलांचा लागेना शोध

नाशिक : जिल्ह्यातून गेल्या चार वर्षात दोन हजार 702 महिला बेपत्ता झाल्या. यामध्ये 334 अल्पवयीन मुली आहेत. यातील बहुतांश जणींचा पोलिसांनाही शोध लागलेला नाही. ही धक्कादायक बाब पोलिसांकडूनच उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते महेंद्र मिसर यांच्या पाठपुराव्यात हे स्पष्ट झाले.

नाशिक शहरातील पंचवटी, आडगाव, उपनगर, देवळाली कॅम्प, नाशिक रोड, सातपूर, अंबड, भद्रकाली, गंगापूर रोड ही पोलिस ठाणे आहेत. जिल्ह्यातील अठ्ठावीस पोलिस ठाण्यांत 2014 ते 2017 या कालावधीत हरविल्याच्या दाखल झालेल्या तक्रारींची माहिती संकलीत करण्यात आली. अनेक हरविलेल्यांच्या तक्रारी दाखलच झालेल्या नाहीत. यामध्ये शहरात 2668, जिल्ह्यात 2077 जण बेपत्ता झाले. यामध्ये शहरातील 1351 महिला व 135 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. जिल्ह्यातील अठ्ठावीस पोलिस ठाण्यात 1017 महिला व 199 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या.

माहिती अधिकारात दीर्घकाळ पाठपुरावा केल्यावर ही माहिती मिसर यांनी मिळवली. त्याचा संबंध थेट कौटुंबिक व सामाजिक आहे. त्यामुळे ही व्यवस्था टिकविण्यासाठी 'संघर्ष नको संवाद हवा. कुटुंब जपूया' हा उपक्रम ते राबवित आहेत. महिलांवरील अत्याचार, फसवणूक, सायबर गुन्हे यांच्याशी संबंधीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, वकिल, डॉक्‍टर, शासकीय कर्मचारी या सगळ्यांच्या सहभागातून त्यावर प्रबोधन केले जोणार आहे.

पालक- मुलांतील तुटत चाललेला संवाद, कौटुंबिक ताण-तणाव, पती- पत्नीतील विसंवाद, सोशल मिडीयाचे भ्रामक जाळे अशा विविध कारणांनी समाजात टोकाची स्थिती निर्माण होत आहे. त्याचा सर्वाधीक दुष्पपरिणाम महिला व कुटुंब व्यवस्थेवर होत आहेत. या तक्रारदारांशी झालेल्या संवादातून ही कारणे पुढे आली आहेतच. अल्पवयीन मुले- मुली किरकोळ कारणातून घरे सोडतात. त्यानंतर त्यांची अनेकदा बिकट अवस्था होते. महिला, अल्पवयीन मुलींना अनेकदा प्रलोभनांना बळी पडतात. त्यात त्याची फसवणूकोहण्याची शक्‍यता असते. त्यामुळे हा गंभीर सामाजिक विषय म्हणून पुढे येतो आहे.

तक्रार दाखल झाल्यावर महिला, नागरीक, अल्पवयीन मुले, मुलींचे छायाचित्र पोलिस आपल्या संकेतस्थळ तसेच पोलिस ठाण्यांना वितरीत करतात. प्रारंभी केवळ नोंद होते. नागीरकांना परिसारत तसेच परिचितांकडे शोध घेण्यास सांगितले. शोध अयशस्वी झाल्यावरचोपलिसांत नोंद होते. त्यामुळे जी संख्या पोलिसांकडून उपलब्ध झाली त्यात वाढ होऊ शकतो. एक गंभीर सामाजिक प्रश्‍न म्हणून त्यावर उपाययोजनेची आवश्‍यकता आहे.

सायबर क्राईमची मदत
हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे अत्यंत क्‍लीष्ट प्रक्रीया असते. त्यासाठी हरविलेल्या व्यक्तीचे मित्र, कुटुंबिया, परिचीतांकडे दिर्घकाळ माहिती घ्यावी लागते. त्याचा उपयोग होतोच असे नाही. मात्र सध्या प्रत्येक शहरात सायबर क्राईम ठाणे उघडण्यात आले आहे. त्यातून मोबाईल संच व सीम कार्ड याद्वारे शोध सोपा झाला आहे. मात्र युवक देखील यामध्ये तरबेज झालेत. अनेकदा हरविलेल्या व्यक्ती मोबाईलचा वापर बंद करतात. नव्या सीम कार्डचा वापर करतात. त्यात सायबर क्राईम शाखा महत्वाची भूमिका बजावते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com