Nashik District Dindori Corporator Wrote Letters to Keep Cleanliness | Sarkarnama

दिंडोरीचे भाजप नगरसेवक तुषार वाघमारेंकडून ग्रामस्थांना हजार पत्रे; स्वच्छतेच्या आग्रहाची

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 डिसेंबर 2019

अनेक नगरसेवक पारंपारिक राजकारण, कामकाजाला बाजुला सारून वेगळी वाट चोखाळतात. उपक्रम करतात. यंदा दिंडोरीचे नगरसेवक वाघमारे यांनीही तसेच केले. नववर्षाची शुभेच्छापत्रे ते पाठवतात.यंदा त्यांनी कचऱ्याच्या समस्येवर जनजागृती करण्यासाठी एक हजार कुटुंबांना स्वहस्ताक्षरात लिहिलेली पोस्टकार्डे पाठवली आहेत

दिंडोरी  : येथील भाजपचे नगरसेवक तुषार वाघमारे दरवर्षी शहरातील नागरीकांना नववर्षाची शुभेच्छा पत्र पाठवतात. यातील अनेक शुभेच्छा पत्रे लोक उघडूनही पाहात नाहीत. त्यामुळे यंदा त्यांनी शक्कल लढवली. एक हजार जणांना स्वहस्ताक्षरात पत्रे लिहिली. शुभेच्छांऐवजी स्वच्छतेचा आग्रह धरणारी व  व महत्व सांगणारी. नागरिकांनी ही पत्र वाचली व परत वाघमारेंच्या उपक्रमाचे कौतुकही केले.

अनेक नगरसेवक पारंपारिक राजकारण, कामकाजाला बाजुला सारून वेगळी वाट चोखाळतात. उपक्रम करतात. यंदा दिंडोरीचे नगरसेवक वाघमारे यांनीही तसेच केले. नववर्षाची शुभेच्छापत्रे ते पाठवतात. ते लोकांच्या अंगवळणी पडले आहे. अनेक ते उघडूनही पहात नाहीत, असा त्यांना फीडबॅक होता. सध्या शहराला अस्वच्छतेने ग्रासले आहे. त्यामुळे वाघमारे यांनी हाच ज्वलंत विषय घेऊन हजार घरांना स्वहस्ताक्षरात लिहिलेली पोस्टकार्डे पाठवली. त्याची चांगलीच चर्चा झाली. अनेकांनी पत्र मिळाल्यावर त्यांची भेट घेऊन आभार मानले. आजुबाजुच्या लोकांनीनव्यक्तीशः पत्र लिहिल्याबद्दल कौतुकही केले.

नगरसेवक वाघमारे यांनी लिहिलेल्या पत्रांचा आशय असा 

माननीय महोदय,
पत्र लिहिण्यास कारण की, मला एका दुर्घर आजाराने ग्रासले आहे आणि त्यातून फक्त आपणच माझी सुटका करु शकतात. मला कर्करोग झालाय. हो अस्वच्छतेचा कर्करोग...! आपल्याकडे मी मोठ्या अपेक्षेने पहात आहे. सांडपाणी,कचरा,प्लास्टिक व इतर अस्वच्छतेने माझा श्वास गुदमरतोय..!

मला हवी आहे आपली मदत..! त्यासाठी स्वच्छतेची सवय स्वत: सोबतच इतरांना ही लावण्यासाठी मला मदत करा.

*ओला व सुका कचरा यांचे वर्गिकरण करुन तो  वेगवेगळा साठवा* व येणाऱ्या नगरपंचायतीच्या घंटागाडीत टाका. *प्लास्टिकचा वापर टाळा*. ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करण्यासाठी तो वेगळा साठवा. अन्यथा  रोगराई, संसर्गजन्य आजार,डास व अस्वच्छतेच्या* विळख्यात माझ्यासोबत आपली येणारी भावी पिढी ही अस्वच्छतेच्या दुर्घर आजाराने ग्रस्त होईल..
 आपली
 *लाडकी दिंडोरी*

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख