जिल्हा बॅंक वसुलीचे राजकीय बुमरँग, शेतकरी नेत्यांनी दिला एल्गारचा नारा

आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व भाजप नेते केदा आहेर यांच्याकडून गेले काही दिवस कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. मात्र ही कारवाईच चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात मोठ्या कर्जदारांएैवजी सहकारी संस्था व शेतकऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे थकबाकीच्या या विषयाने आता राजकीय वळण घेतले आहे. येत्या बुधवारी जिल्ह्यातील नेते, संघटना याविरोधात एल्गार करणार आहेत.
जिल्हा बॅंक वसुलीचे राजकीय बुमरँग, शेतकरी नेत्यांनी दिला एल्गारचा नारा

नाशिक : आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व भाजप नेते केदा आहेर यांच्याकडून गेले काही दिवस  कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. मात्र ही कारवाईच चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात मोठ्या कर्जदारांएैवजी सहकारी संस्था व शेतकऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे थकबाकीच्या या विषयाने आता राजकीय वळण घेतले आहे. येत्या बुधवारी जिल्ह्यातील नेते, संघटना याविरोधात एल्गार करणार आहेत. 

जिल्हा बॅंकेसह सरकारी बॅंकांकडुन सुरु झालेल्या कर्ज वसुली विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी बुधवारी (ता.१५) सकाळी दहाला निफाड येथील बाजार समीतीच्या आवारात शेतकरी संघटना प्रतीनीधींचा बैठक होणार आहे. शेतकरी आत्महत्या वाचवा अभीयानांतर्गत ही बैठक होणार आहे. 'आता रडायचं नाही तर लढायचं' अशी घोषणा देऊन शेतकऱ्यांना या बैठकीस आमंत्रित करण्यात आले आहे.

यापुढे कोणत्याही बॅंकेचे वसुली अधीकारी दारापुढे आल्यास आम्हाला बोलवा. असे आवाहनच त्यांनी कर्जदार शेतकऱ्यांना केले आहे. बुधवारी सकळी होणाऱ्या बैठकीस स्वाभीमनी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर या आत्महत्या वाचवा अभियानास सुरुवात होईल. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा मिळणार असला तरी कर्ज वसुली करतांना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या बैठकीस कर्जदार शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोमनाथ बोराडे, नाना बच्छाव, साहेबराव मोरे, सुधाकर मोगल यांनी केले आहे. 

जिल्हा बॅंकेने वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला (वसाका) जप्तीची नोटीस दिल्यावर त्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांनी यापुर्वीच प्रश्‍नचिन्ह उभे करीत इशारा दिला होता. हा कारखाना राज्य सहकारी बॅंकेकेडून कर्ज घेतो. त्याची मालमत्ता आधीच राज्य सहकारी बॅंकेने जप्त करुन कारखाना अवसायानात काढला असतांना ही नोटीस कशी? असा त्यांचा प्रश्‍न आहे. बड्या कर्जदारांविषयीही अशीच आडकाठी आल्याने जिल्हा बॅंकेची कारवाई राजकीयदृष्ट्या बुमरॅंग ठरु लागल्याची चिन्हे आहे. आंदोलनाचा इशारा देणारे  हंसराज वडघुले निफाड विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे हे आंदोलन राजकीयदृष्टया उत्सुकता वाढविणारे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com