Nashik District Bank Ghost Story | Sarkarnama

गैरकारभाराने नव्हे 'भूतबाधे'मुळे जिल्हा बॅंक संकटात?

सरकारानामा ब्युरो 
बुधवार, 8 मे 2019

नाशिक : कालची मंत्रभूमी आजची तंत्रभूमी...असा नाशिकचा उल्लेख अभिमानाने केला जातो. मात्र आता दिवस बदललेत. नाशिक आता भूतबाधेचे शहर होण्याच्या मार्गावर आहे की काय, अशी स्थिती राजकीय नेत्यांनी तयार केली आहे. कारण जिल्हा बॅंकेचे स्थलांतर होते आहे. याचे कारण काय तर म्हणए बॅंकेला भूतबाधा झाली आहे!

नाशिक : कालची मंत्रभूमी आजची तंत्रभूमी...असा नाशिकचा उल्लेख अभिमानाने केला जातो. मात्र आता दिवस बदललेत. नाशिक आता भूतबाधेचे शहर होण्याच्या मार्गावर आहे की काय, अशी स्थिती राजकीय नेत्यांनी तयार केली आहे. कारण जिल्हा बॅंकेचे स्थलांतर होते आहे. याचे कारण काय तर म्हणए बॅंकेला भूतबाधा झाली आहे!

नियमबाह्य कामकाजामुळे नाबार्डने जिल्हा बॅंकेवर बरखास्तीची नोटीस बजावली. नोटबंदीमुळे ३२१ कोटींच्या जुन्या नोटा बदलून मिळाल्या नाही. नेते कर्जफेड करीत नाहीत. नवे कर्ज मिळत नसल्याने शेतकरी कर्जफेड करीत नाहीत. दोन हजार ७०० कोटींची थकबाकी झाली आहे. यावर काटेकोर व्यवस्थापन व कामकाजात सुधारणा हा एकमेव मार्ग आहे. मात्र, ते टाळून काही कर्मचा-यांनी बॅंक कब्रस्तानच्या जागेवर असल्याने भूतबाधा झाल्याचे वरिष्ठांच्या मनात भरवले. त्यांनीही ते मान्य केले. घाईगर्दीत अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बॅंकेच्या जुन्या मुख्यालयात तिजोरीचे पूजन व सत्यनारायणाची कार्यक्रम केला. यावरून आधीच वादात सापडलेल्या बॅंकेच्या पदाधिकारी व प्रश्नावर टीकेचा पाऊस पडत आहे. हा प्रकार तातडीने थांबवावे आणि कामकाजात सुधारणा करावी असे बोलले जात आहे.

दरम्यान जुन्या कार्यालयात अनेक अडचणी आहेत. वाहनतळ नाही. एक मजला भाड्याने दिलेला आहे. त्याचे उत्पन्न बुडालेला आणि दुरूस्तीवर मोठा खर्च होईल. त्यामुळे हा अवैज्ञानिक निर्णय घेऊ नये यासाठी दबाव वाढू लागला आहे. बॅंकेचे अध्यक्ष व भाजप नेते केदा आहेर यांच्या या निर्णयावर मोठी टीका होत आहे. मात्र ते आज प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. त्यांचा भ्रमणध्वनी उचलला जात नव्हता. 

आजचे प्रगत युग आहे. समाज शिक्षीत झालेला आहे. त्यात बॅंकेविषयी भूतबाधा झाल्याची बातमी धक्कादायक आहे. आम्ही प्रशासनाचे निर्णय बदलण्यासाठी मतपरिवर्तन करू - रतन जाधव, अध्यक्ष, जिल्हा बॅंक कर्मचारी संघटना.

नाशिक हे अत्यंत प्रगत शहर आहे. त्याचा उल्लेख पौराणिक काळात मंत्रभूमी असा होत असे. विसाव्या शतकात औद्योगिक विकासामुळे यंत्रभूमी बनले. भाजपचे नेते एकविसाव्या शतकात नाशिकला भूतांची भूमी करू पाहत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात हे घडतेय याची खंत वाटते - महेश भामरे, राज्य कार्यकारीणी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस.

राजकीय घडामोडींच्या बित्तंबातमीसाठी - www.sarkarnama.in
सरकारनामा ट्वीटर - https://twitter.com/MySarkarnama
सरकारनामा फेसबूक - https://www.facebook.com/MySarkarnama/

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख