'रेन फाॅरेस्ट' नगरपरिषद उमेदवारांना उच्च शिक्षणाचे वावडे?

येथील इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीचे उद्या (ता.9) मतदान होत आहे. यामध्ये शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारात त्रिकोणी लढत आहे. मात्र गंमत म्हणजे यातील सर्वच्या सर्व उमेदवारांचे शिक्षण अवघे पाचवी ते दहावीपर्यंतच आहे. पार्टी वीथ डिफरस्न 'भाजप', सत्ताधारी शिवसेनाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे नगरपरिषदेचे भावी कारभारी व त्यांचा प्रचार चर्चेचा विषय ठरले आहेत.
'रेन फाॅरेस्ट' नगरपरिषद उमेदवारांना उच्च शिक्षणाचे वावडे?

नाशिक : येथील इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीचे उद्या (ता.9) मतदान होत आहे. यामध्ये शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारात त्रिकोणी लढत आहे. मात्र गंमत म्हणजे यातील सर्वच्या सर्व उमेदवारांचे शिक्षण अवघे पाचवी ते दहावीपर्यंतच आहे. पार्टी वीथ डिफरस्न 'भाजप', सत्ताधारी शिवसेनाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे नगरपरिषदेचे भावी कारभारी व त्यांचा प्रचार चर्चेचा विषय ठरले आहेत.

रेल्वेचे जंक्‍शन आणि ब्रिटीशकालीन नगरपरिषद, राज्यातील महाबळेश्‍वरनंतर सर्वाधिक साडे तीन हजार मीलीमीटर पावसाचा हा परिसर मुंबईकरांसाठी 'रेन फॉरेस्ट' म्हणून वन डे डेस्टीनेशन म्हणून लोकप्रिय आहे. या शहराच्या विकास व विस्ताराला मर्यादा आहेत. मात्र, उमेदवारांचे जाहिरनामे आणि घोषणा शहराचा कायापालट करणे, पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता आणि या शहराला आघाडीचे शहर बनविणे असे आहे.

नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमधुन आयात केलेले फिरोज पठाण, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बद्रीनाथ शर्मा, भारतीय रिपब्लिकन पार्टीचे पंडीत बाळु हरी आणि शिवसेनेचे बंडखोर महेश शेवाळे यांसह अपक्ष राजु कदम, मेमन महमुद हारुण अब्दुल करीम असे सात उमेदवार आहेत. मात्र, तिन्ही राजकीय पक्षांचे उमेदवार दहावी उत्तीर्ण तर उर्वरीत सर्व उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते नववी असे आहे.

महापालिकेच्या अठरा जागांसह नगराध्यक्षपदाचे एकुण 86 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अवघे सहा उमेदवार शिक्षीत आहेत. विशेष म्हणजे चार उमेदवार शाळेतच गेलेले नसल्याने त्यांना अक्षरओळख देखील नाही. यातील गीता बाळु मेंगाळ ही अनुसुचित जमातीच्या महिला उमेदवाराची एकुण संपत्ती अवघी तेवीस हजार रुपये आहे. त्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com