निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये रंगली 'चाय पे चर्चा' 

थंडीमुळे हुडहुडी भरलेली असताना कधी काळी टपरीवर चहा घेताना रंगणाऱ्या किश्‍श्‍यांची आठवण सांगताना उबदार वातावरण अनुभवायला मिळाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या काळातील टपरीवरील चहाच्या आठवणी सांगितल्या. औचित्य होते, कॉलेज रोडवरील सलीम टी टॉल येथे आयोजित 'आठवणीतला चहा' या अनोख्या उपक्रमाचे. योगायोगाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या उपक्रमात महाविद्यालयीन आठवणीच्या उपक्रमात राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत चांगलीच रंगली.
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये रंगली 'चाय पे चर्चा' 

नाशिक : थंडीमुळे हुडहुडी भरलेली असताना कधी काळी टपरीवर चहा घेताना रंगणाऱ्या किश्‍श्‍यांची आठवण सांगताना उबदार वातावरण अनुभवायला मिळाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या काळातील टपरीवरील चहाच्या आठवणी सांगितल्या. औचित्य होते, कॉलेज रोडवरील सलीम टी टॉल येथे आयोजित 'आठवणीतला चहा' या अनोख्या उपक्रमाचे. योगायोगाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या उपक्रमात महाविद्यालयीन आठवणीच्या उपक्रमात राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत चांगलीच रंगली. 

या कार्यक्रमास मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे अजय बोरस्ते, स्थायी समिती सभापती भाजपच्या हिमगौरी आडके-आहेर, शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे, काँग्रेस नेते शैलेश कुटे, अतुल चांडक आदी नेते महाविद्यालयीन आठवणींत रमले. यात ओघाने राजकीय विषय, निवडणुकांची चर्चा झालीच. अशोका ग्रुपचे अशोक कटारिया, पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस अधीक्षक संजय दराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड आदींनीही त्याचा आनंद घेतला. 

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गर्भे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. 'आरजे' भूषण मटकरी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येकाने आपल्या काळातील किस्से सांगताना उपस्थितांना खदखदून हसवले. मोहन उपासनी यांनी बासरीवादन, तर अनिल दैठणकर यांनी व्हायोलिनवादन केले. रसिका नातू व गीता माळी यांनी गाणी सादर केली. सुमारे पाचशे व्यक्‍तींनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संयोजन जनस्थान ग्रुपने केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com