Nashik Deola Agitation Arrest | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना देवळ्यात अटक 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सकल मराठा क्रांती मोर्च्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज देवळा येथे गुजरातला जाणारा मुख्य रस्ता असलेल्या पाचकंदील येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने मागण्यांना प्रतिसाद न दिल्यास मराठा क्रांती मोर्चातर्फे बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला.

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सकाळी देवळा येथे घोषणा देत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाळीसहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केले. सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्यात सहभागी झाले. यावेळी शासनाने आरक्षणाविषयी ठोस निर्णय न झाल्यास येत्या 9 ऑगस्टला देवळा परिसरात बेमुदत बंद पुकारण्यात येईल असा इशारा देण्यात आला. 

सकल मराठा क्रांती मोर्च्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज देवळा येथे गुजरातला जाणारा मुख्य रस्ता असलेल्या पाचकंदील येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने मागण्यांना प्रतिसाद न दिल्यास मराठा क्रांती मोर्चातर्फे बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला.

यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पंकज (मुन्ना) आहेर, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अतुल पवार, मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक मिलिंद पगार, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अशोक आहेर, मनोज आहेर, नंदकुमार जाधव, मनसेचे तालुकाध्यक्ष योगेश (नानु) आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर, प्रतीक आहेर, तुषार शिंदे, उमेश देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र शिरसाठ, बापूसाहेब आहेर, दिलीप आहेर, बाळासाहेब आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर, चेतन आहेर, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख