नाशिकला इतिहासाची पुनरावृत्ती : वीस वर्षांपूर्वी वडीलांकडे तर आता मुलीकडे स्थायीचे सभापती पद - Nashik daughter follows father's footsteps in politics | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकला इतिहासाची पुनरावृत्ती : वीस वर्षांपूर्वी वडीलांकडे तर आता मुलीकडे स्थायीचे सभापती पद

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 मार्च 2018

नाशिक स्थायी समितीत इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे .  वीस वर्षांपूर्वी वडील तर आता मुलीकडे   सभापती पद आले आहे . सौ. हिमगौरी आडके- आहेर या प्रथमच भाजपतर्फे प्रभाग 7 मधून निवडून आल्या आहेत.

नाशिक : नाशिक स्थायी समितीत इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे .  वीस वर्षांपूर्वी वडील तर आता मुलीकडे   सभापती पद आले आहे . सौ. हिमगौरी आडके- आहेर या प्रथमच भाजपतर्फे प्रभाग 7 मधून निवडून आल्या आहेत.

राजकीय वारसा लाभल्याने त्या पहिल्याच टर्ममध्ये 'स्थायी' समितीच्या सभापती झाल्या. यामध्ये दोघा ज्येष्ठ इच्छुकांना मागे टाकत त्यांनी पदाला गवसणी  घातली. त्या शहराच्या पहिल्या महिला व तरुण वयाच्या सभापती ठरल्या. विशेष म्हणजे वीस वर्षांपूर्वी त्यांचे वडील सभापती झाले होते.

आज झालेल्या निवडणुकीत सोळा सदस्यांत भाजपचे नऊ तर विरोधी शिवसेनेचे चार, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे यांचे प्रत्येकी तीन असे सात सदस्य होते. मात्र भाजपतील उध्दव निमसे व दिनकर पाटील हे दोघे ज्येष्ठ सदस्य इच्छुक होते. त्यांना नेत्यांनी 'शब्द' दिल्याचीही चर्चा होती.

त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी हुकलेल्यांनी वेगळी भूमिका घेतली तर शिवसेनेला संधी मिळेल असे आडाखे होते. याची कुणकुण लागल्याने स्पष्ट बहुमत असतांनाही भाजपने खबरदारी म्हणुन सदस्यांना मुंबईच्या सहलीला नेले होते.

प्रत्यक्षात भाजपने टाकलेल्या डावात मनसेचे सय्यद मुशीर हेच अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेच्या मनसुब्यांवर पाणी फिरले. हिमगौरी सहज सभापती झाल्या.  1997 मध्ये त्यांचे वडील डॉ. बाळासाहेब आहेर 'स्थायी'चे सभापती झाले होते. त्याची पुनरावृत्ती वीस वर्षांनी झाली.

हिमगौरी यांचे वडील डॉ. बाळासाहेब आहेर हे माजी आरोग्यमंत्री (कै) डॉ. दौलतराव आहेर यांचे भाऊ तर देवळा- चांदवड मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांचे काका आहेत. माजी नगरसेवक तसेच स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. सौ. हिमगौरी यांची आई प्रा. शोभना ही के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य असुन त्यादेखील माजी नगरसेविका आणि माजी उपमहापौर आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख