Nashik CP Becomes IronMan | Sarkarnama

नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल ठरले आयर्न मॅन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

15 तास 13 मिनिटांमध्ये स्पर्धा पूर्ण करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त सिंघल हे पहिले आयपीएस अधिकारी ठरले. त्यांचे विविध संस्था व सहका-यांनी अभिनंदन केले. वयाच्या पन्नाशीला पोहोचलेल्या आयुक्त सिंघल यांनी त्यासाठी अतिशय खडतर परिश्रम व सराव केला आहे.

नाशिक : फ्रान्स येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये भारताकडून सहभागी होत नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सदरचा किताब पटकावला आहे. त्यांनी 180 किलोमीटर सायकलिंग, 4 किलोमीटर स्विमिंग आणि 42 किलोमीटर रनिंग असे स्पर्धेतील टप्पे पूर्ण केले. त्यासाठी 16 तासांची निर्धारित वेळ होती. मात्र सिंगल यांनी यासाठी 15 तास 13 मिनिटांची वेळ नोंदविली आहे. महाराष्ट्र पोलीस दलासाठी आणि नाशिक पोलीस आयुक्तालयासाठी ही बाब नावलौकिकात भर घालणारी ठरली आहे.

15 तास 13 मिनिटांमध्ये स्पर्धा पूर्ण करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त सिंघल हे पहिले आयपीएस अधिकारी ठरले. त्यांचे विविध संस्था व सहका-यांनी अभिनंदन केले. वयाच्या पन्नाशीला पोहोचलेल्या आयुक्त सिंघल यांनी त्यासाठी अतिशय खडतर परिश्रम व सराव केला आहे. यापूर्वीही त्यांनी यापूर्वी नोव्हेंबर, 2017 मध्ये 360 किलोमीटरची पुणे- गोवा सायकल स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख