Nashik Corporators Delhi Visit | Sarkarnama

नाशिकचे नगरसेवक- नेते पडले केजरीवालांच्या 'दिल्ली मॉडेल'च्या प्रेमात

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

देशाची राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या केजरीवाल सरकारच्या 'दिल्ली मॉडेल' पाहण्यास येथील विविध पक्षांचे नगरसेवक गेले होते. त्याचे स्वरूप पाहून ते त्या काम व कार्यपद्धतीच्या प्रेमात पडले. नाशिकच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सुद्धा दिल्ली मॉडेल पाहण्यासाठी दिल्लीला नुकतीच भेट दिली.  

नाशिक : देशाची राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या केजरीवाल सरकारच्या 'दिल्ली मॉडेल' पाहण्यास येथील विविध पक्षांचे नगरसेवक गेले होते. त्याचे स्वरूप पाहून ते त्या काम व कार्यपद्धतीच्या प्रेमात पडले. नाशिकच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सुद्धा दिल्ली मॉडेल पाहण्यासाठी दिल्लीला नुकतीच भेट दिली.  

नाशिकचे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ, विद्यमान नगरसेवक व माजी उपमहापौर गुरमीत बग्गा, मनसेचे नेते डॉ. प्रदीप पवार, तसेच आनंद सोनवणे यांनी दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक व सरकारी शाळांना भेट दिली. त्यांच्यासोबत 'आप युवा आघाडी'चे प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील घिया ही होते. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या 'दिल्ली मॉडेल' ची चर्चा आहे. संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून यांनी देखील दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिक व सरकारी शाळांचे प्रत्यक्ष दिल्लीस भेट देऊन कौतुक केले होते.

मुंबई मनपानेदेखील मोहल्ला क्लीनिक बनविण्याची योजना दिल्ली मॉडेलच्या  नाशिकच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी व नेत्यांना दिल्लीला घेऊन गेली. 'शिक्षण-आरोग्य-वीज-पाणी' या सूत्रांवर आधारित हे दिल्ली मॉडेल आहे. या मोहल्ला क्लिनिक मध्ये 50 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या अगदी मोफत केल्या जातात. शिवाय औषधेही मोफत दिली जातात. नाशिकला येत्या काळात 'मोहल्ला क्लिनिक' प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा मानस नगरसेवक बग्गा यांनी व्यक्त केला. त्यांनतर त्यांनी पटपडगंज या उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या विधानसभा मतदारसंघातील सरकारी 'राजकीय सर्वोदय' या विद्यालयातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव व  फाईव्ह स्टार दर्जाच्या वर्गखोल्या, त्यांची स्वच्छता, शाळेतील रंगसंगती, मार्बलचा वापर करून बनविलेली लॉबी, सुंदर बाके, डिजिटल क्लासरूम, शिक्षकांसाठीही विशेष सुविधा, मुलींसाठी चेंजिंग रूम्स, अॅक्टिव्हिटी गॅदरींग रूम्स, टॉयलेट आदीं सुविधांची पाहणी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख