मुख्यमंत्र्यांच्या आगमानाआधीच काढली भाजप नेत्याची होर्डींग्ज!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या बुधवारी नाशिकला येत आहे. त्याच्या स्वागतासाठी भाजप नेत्यांत होर्डिंग्जची स्पर्धा रंगली आहे. माजी आमदार वसंत गिते व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांची होर्डीग्ज आज महापालिकेने काढली. त्यामुळे 'पोस्टर वाॅर' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
Hoardings in Nashik Removed Before CMs Arriva
Hoardings in Nashik Removed Before CMs Arriva

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या बुधवारी नाशिकला येत आहे. त्याच्या स्वागतासाठी भाजप नेत्यांत होर्डिंग्जची स्पर्धा रंगली आहे. माजी आमदार वसंत गिते व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांची होर्डीग्ज आज महापालिकेने काढली. त्यामुळे 'पोस्टर वाॅर' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

बुधवारी होणा-या कार्यक्रमासाठी रविवारीच शहरात पोस्टर, होर्डींग्ज, स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात ही होर्डींग्ज लावल्याने विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी काल होर्डींग्ज लावण्याचा प्रयत्न केला असता मोक्याच्या सर्व जागा आधीच व्यापलेल्या आढळल्या. त्यामुळे त्यांना स्वतः या भागात फिरून होर्डींग्जच्या जागा शोधाव्या लागल्या. त्यात एका जागेवर दोन दोन होर्डींग्ज लावावी लागली. त्यातुन नेत्यांत सुंदोपसुंदी सुरुच होती. 

हे देखिल वाचा - 

त्याचीच तक्रार थेट महापालिकेकडे पोहोचली. त्यातुन महापालिकेने आज विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार वसंत गिते यांचेच होर्डींग्ज महापालिकेने काढली. त्यामुळे महाजनादेश यात्रेआधीच पुन्हा एकदा 'होर्डींग्ज वाॅर' रंगण्याची चिन्हे आहेत. 

आम्ही होर्डींग्ज लावण्यासाठी परवानगी घेतली होती. मात्र, उत्साही कार्यकर्त्यांनी थोडे जादा होर्डींग्ज लावली होती. महापालिकेने ही होर्डींग्ज काढून घेतली. त्यांनी आम्हाला कल्पना देऊन काढली आहेत.- वसंत गिते, माजी आमदार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com