Nashik Corporation Engineer Commits Suicide | Sarkarnama

नाशिकच्या पालिका अभियंत्याची आत्महत्या बदलीने आलेल्या ताणामुळे?

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

तीन महिन्यापूर्वीच महापालिकेचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी लिहून बेपत्ता झाले होते. मात्र त्यांना पुणे येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रत्यक्ष आत्महत्येचा प्रकार घडला आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक व महापालिका पदाधिकाऱ्यांनी कुटुबीयांच्या सांत्वनासाठी गर्दी केली होती. या आत्महत्येविषयी महापालिकेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

नाशिक : महापालिकेच्या घरपट्टी विभागातील सहाय्यक अधीक्षक संजय दादा धारणकर (वय 45) यांनी आज आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. नव्या विभागात बदली झाल्याने कामाचा ताण वाढल्याने ते तणावात होते. त्यातूनच ही घटना झाली असावी असे धारणकर यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. या खळबळजनक घटनेनंतर विविध नगरसेवक व महापालिका पदाधिकाऱ्यांनी सांत्वनासाठी गर्दी केली. 

आज सकाळी महापालिकेच्या घरपट्टी विभागातील सहाययक अधीक्षक संजय दादा धारणकर ( रा, आकाशवाणी जवळ, ऋषिकेश टॉवर, गंगापूर रोड) यांनी निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्त्या केली. दीर्घ रजेनंतर ते कालच (ता1) महापालिकेत हजर झाले होते. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे गंगापूर पोलिसांनी सांगितले. सकाळी मुलगी शाळेत गेल्यावर त्यांच्या पत्नी मंदीरात पुजेसाठी गेल्या होत्या. घरी त्यांच्या वृध्द आई एकट्याच होत्या. पत्नी घरी परतल्यावर धारणकर दरवाजा उघडत असल्याने त्या मागच्या बाजुस गेल्या. तेथे त्यांना  धारणकर यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यावर हा प्रकार उघडकीस आला. 

तीन महिन्यापूर्वीच महापालिकेचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी लिहून बेपत्ता झाले होते. मात्र त्यांना पुणे येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रत्यक्ष आत्महत्येचा प्रकार घडला आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक व महापालिका पदाधिकाऱ्यांनी कुटुबीयांच्या सांत्वनासाठी गर्दी केली होती. या आत्महत्येविषयी महापालिकेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख