nashik corporation | Sarkarnama

नाशिकमध्ये महिला व बालकल्याण समितीवर भाजपकडून नवखे सदस्य

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 एप्रिल 2017

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्यांची नावे आज जाहीर करण्यात झाली. यामध्ये भाजपकडून प्रियांका घाटे, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, सरोज आहिरे व शीतल माळोदे या नवख्या सदस्यांची नियुक्ती झाली. तर शिवसेनेकडून सत्यभामा गाडेकर, नयना गांगुर्डे, पूनम मोगरे या अनुभवी सदस्या आहेत. त्यामुळे बहुमत असले तरी भाजपकडून प्रभावी कामकाजाऐवजी नवख्या सदस्यांचा बहुतांश कालावधी अभ्यासातच जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून समिना मेमन यांना संधी मिळाली. महापालिकेत भाजपचे 66 सदस्य निवडून आल्याने पक्षीय बलाबलानुसार नऊ सदस्यांच्या समितीवर भाजपच्या पाच सदस्यांना संधी देण्यात आली. शिवसेनेचे 35 नगरसेवक असल्याने तिघांना समितीवर संधी देण्यात आली तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समसमान पक्षीय बलाबल असल्याने दोन्ही कॉंग्रेस पैकी एका सदस्याला समितीवर संधी मिळणार होती. दोन्ही गटनेत्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार पहिल्या वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसला संधी देण्यात आली तर पुढील वर्षी कॉंग्रेसच्या सदस्याला समितीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. भाजपकडून समितीवर संधी मिळालेल्या महिला नगरसेवक प्रथमच निवडून आल्या आहेत. सभापती पदावर त्यांच्यातूनच एकाची निवड केली जाणार असल्याने पालिकेच्या इतिहासात प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांना समितीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांपैकी सत्यभामा गाडेकर व समिना मेमन या दोन नगरसेविकांना कामाचा अनुभव आहे त्याव्यतिरिक्त सर्व नगरसेवक नवखे आहे. महिला व बालकल्याण समितीला एकूण अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधी प्राप्त होतो त्यातून महिला व बालकांसाठी विशेष योजना राबवाव्या लागतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख