nashik constiuency satyaji tambe | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

भुजबळाचे तळ्यात मळ्यात असेल तर नाशिक मतदारसंघ द्या ! कॉंग्रेसचा दावा 

संपत देवगिरे 
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रभावी उमेदवार नाही. त्यामुळे या मतदारसंघावर कॉंग्रेस पक्षाने दावा केला आहे. त्यासाठी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव शुक्रवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आली आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कॉंग्रेस पक्षाची बैठक काल मुंबईत झाली. यावेळी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सुचना घेण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील नाशिक व दोंडोरी या दोन्ही मतदारसंघांविषयी चर्चा झाली. 

यावेळी हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने त्यातील विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेस पक्षाला संघटनात्मक विस्तारात अडचणी येतात. नवे नेते तयार होत नाहीत. इच्छुक उमेदवार तयार होत नाही. दिंडोरीत गेल्या तीन निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव होत आहे. त्यामुळे तो मतदारसंघ कॉंग्रेसला घ्यावा. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारच नाही. छगन भुजबळ लढण्यास तयार नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ डॉ. सत्यजीत तांबे यांच्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडे घ्यावा. डॉ. तांबे यांचा इगतपुरी, सिन्नरसह नाशिक शहरात उत्तम संपर्क आहे. त्याचा पक्षाला लाभ होईल अशी सुचना नगरसेवक राहूल दिवे यांनी केली. 

माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे यांनीही याबाबत सुचना केल्या. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तपशीलवार चर्चा केली. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांविषयी नवा विषय पुढे आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही विचारमंथन होण्याची शक्‍यता वाढली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख