नगरसेवक राहूल दिवेंच्या मिसळ पार्टीने काँग्रेसजन आले एकत्र!

मरगळलेल्या काँग्रेसला सक्रीय करण्यासाठी सध्या येथील युवक काँग्रेस चांगलीच सक्रीय झाली आहे. आज युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक राहूल दिवे यांनी आपला वाढदिवस जुन्या जाणत्या काँग्रेसजनांच्या एकत्रीकरणासाठी मिसळ पार्टीने साजरा केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अगदी सकाळी आठला झालेल्या या प्रवाहावेगळ्या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती पाहून काँग्रेसजनांत उत्साह संचारला होता.
नगरसेवक राहूल दिवेंच्या मिसळ पार्टीने काँग्रेसजन आले एकत्र!

नाशिक : मरगळलेल्या काँग्रेसला सक्रीय करण्यासाठी सध्या येथील युवक काँग्रेस चांगलीच सक्रीय झाली आहे. आज युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक राहूल दिवे यांनी आपला वाढदिवस जुन्या जाणत्या काँग्रेसजनांच्या एकत्रीकरणासाठी मिसळ पार्टीने साजरा केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अगदी सकाळी आठला झालेल्या या प्रवाहावेगळ्या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती पाहून काँग्रेसजनांत उत्साह संचारला होता.

राजकीय नेते, त्यातही नाशिकच्या मरगळ आलेल्या काँग्रेसचे नेत्यांची सकाळ सूर्य डोक्‍यावर आल्यावरच होते. येथील युवकांचा काँग्रेस जागर कार्यक्रम त्याला अपवाद ठरला. नाशिक लोकसभा अध्यक्ष, नगरसेवक राहूल दिवे यांनी वाढदिवसानिमित्त जुन्या, जाणत्यांना एकत्र आणण्यासाठी पुणे महामार्गावरील श्रीकृष्ण लॉन्स येथे सकाळी आठला हा कार्यक्रम ठेवला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात या कार्यक्रमासाठी सकाळी आठलाच हजर झाले. पाहुणे आले. मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी नव्हते. त्यांनीही उपस्थितांशी उत्साहाने गप्पा मारल्या. अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर धावपळ करीत कार्यकर्ते पदाधिकारी पोहोचले. त्यातील अनेक जॉगींगच्या ट्रॅकसुटसह आले होते. ऐंशी वर्षांचे यशवंत बस्ते हे आपल्यासमवेत विविध ज्येष्ठांनाही घेऊन आले होते. 

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, ''आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात बदल झालेला दिसेल. काँग्रेसला अनुकुल वातावरण आहेच. ते वेगळे सांगायला नको. मात्र आज समाजातील प्रत्येक घटक त्याच्या अडचणी सांगत आहे. सरकारने केले काहीच नाही मात्र प्रचार जोरात सुरु आहे. अशा स्थितीत काँग्रेस विचाराच्या लोकांनी कल्पकतेने या संधीचा लाभ घ्यावा. लोकांमध्ये जाऊन त्यांना दिलासा द्यावा. मिसळ पार्टीसारखे उपक्रमाचे मला सुद्धा कौतूक वाटते," 

यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेविका हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, नगरसेविका आशा तडवी, वत्सलाताई खैरे, सुनिल आव्हाड, मोहन करंजकर, बबलु खैरे, सुरेश मारु, जगदीश पवार, उध्दव पवार, माजी उपमहापौर गुलाम शेख, ज्ञानेश्‍वर गायकवाड, आकाश छाजेड, प्रसाद नागवंशी, स्वप्नील पाटील आदींनी शुभेच्छा देत दिवे यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com