काँग्रेसचे तुषार शेवाळे देणार शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसेंना टक्कर

मालेगाव बाह्य हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला मतदारसंघ यंदा काँग्रेसला दिला जाणार आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीने आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. संभाव्य उमेदवार डाॅ तुषार शेवाळे उमेदवारी करणार आहेत.
Congress Leader Dr. Tushar Shewale Meets Sharad Pawar
Congress Leader Dr. Tushar Shewale Meets Sharad Pawar

नाशिक : मालेगाव बाह्य हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला मतदारसंघ यंदा काँग्रेसला दिला जाणार आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीने आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. संभाव्य उमेदवार डाॅ तुषार शेवाळे उमेदवारी करणार आहेत.

हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राज्यमंत्री दादा भुसे येथील विद्यमान आमदार आहेत. गेल्या तीन निवडणुकीत त्यांनी त्यांचे परंपरागत विरोधक हिरे कुटुंबियांचा पराभव केला आहे. सहकार महर्षी व दिवंगत नेते भाऊसाहेब हिरे यांचा हा मतदारसंघ मानला जातो. राज्याच्या राजकारणात हा चर्चीत मतदारसंघ राहिला आहे. भाऊसाहेब हिरे, व्यंकटेश हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांनी या मतदार संघाचे व राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व केले आहे. 

१९९९ पासून येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देत आली आहे. यंदा त्यात बदल करावा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकलेल्या डाॅ तुषार शेवाळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रस्ताव दिला होता. त्यासाठी अद्वय हिरे, शेवाळे व अन्य नेत्यांचा समावेश असलेली समिती नेमली होती. या समितीचे एकमत झाल्याने त्यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com