सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्याचा निर्णय सीमा हिरेंना तारणार?

महापालिकेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोतील घरे अतिक्रमित ठरवत बुलडोझर चालविण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सिडको वासियांमध्ये दहशत निर्माण झाली. आमदार सीमा हिरे यांनी तत्काळ उच्च न्यायालयात धाव घेत मुंढेंच्या निर्णयावर स्थगिती आणली. त्यातून सिडको वासियांना दिलासा मिळाला. त्यामुळे त्यांची ही धावपळ यंदाच्या निवडणुकीत त्यांना तारते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Seema Hiray Nashik
Seema Hiray Nashik

नाशिक : महापालिकेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोतील घरे अतिक्रमित ठरवत बुलडोझर चालविण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सिडको वासियांमध्ये दहशत निर्माण झाली. आमदार सीमा हिरे यांनी तत्काळ उच्च न्यायालयात धाव घेत मुंढेंच्या निर्णयावर स्थगिती आणली. त्यातून सिडको वासियांना दिलासा मिळाला. त्यामुळे त्यांची ही धावपळ यंदाच्या निवडणुकीत त्यांना तारते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शहरातील सिडकोवासीयांचे अनेक प्रश्‍न आहेत. येथील सिडकोतील 99 वर्षे कराराची होती. आमदार हिरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यातुन ही घरे फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला गेला. हे दोन महत्वाचे निर्णय सौ. हिरे यांच्या विजयात मोठा वाटा ठरणार असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सिडकोच्या सहा स्किम उभारल्या गेल्या त्यावेळी कुटुंबाचा आकार दोघांपुरताचं मर्यादीत होता. कालांतराने कुटुंबाचा आकार वाढला दोनाचे चार व चाराचे आठ हात झाल्याने घरे कमी पडू लागली.

कामगार वर्ग असल्याने प्रत्येकालाच नवीन घर घेणे परवडतं असे नसल्याने नाईलाजाने का होईना घराचा आकार वाढवावा लागतो. नागरिकांची ही गरजं ओळखून सिडकोतील घरांसाठी अतिरिक्त एफएसआय देण्याची मागणी पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी शासनाकडे केल्याने सत्ता आल्यानंतर सिडकोला त्याचा लाभ पदरात पडणार आहे. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील समस्या सोडविणे, रस्ते, पायाभुत सुविधा पुरविणे, अंबड औद्योगिक वसाहती मध्ये अग्निशमन केंद्राची निर्मिती या बाबी त्यांचा मतांचा टक्का वाढविण्यास फायदेशीर ठरणार आहेत, असे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com