Nashik Candidates Worrided about Ads regarding Crimes against Them | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

गुन्ह्याच्या जाहिरातीच्या स्मरणाने नाशिकचे उमेदवार धास्तावले

संपत देवगिरे
बुधवार, 17 एप्रिल 2019

निवडणूक आयोगाच्या सुधारीत निर्देशानुसार उमेदवारांना आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देणे, बंधनकारक आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उमेदवारांच्या प्रतिनिधींना स्मरण करुन देण्यात आले. अद्याप एकाही उमेदवाराने याविषयीची जाहिरात दिलेली नाही. मात्र, त्याचाही सोशल मिडीयावर प्रचार होईल याची नाशिकच्या सर्वच प्रमुख उमेदवारांनी धास्ती घेतली आहे.

नाशिक : निवडणूक आयोगाच्या सुधारीत निर्देशानुसार उमेदवारांना आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देणे, बंधनकारक आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उमेदवारांच्या प्रतिनिधींना स्मरण करुन देण्यात आले. अद्याप एकाही उमेदवाराने याविषयीची जाहिरात दिलेली नाही. मात्र, त्याचाही सोशल मिडीयावर प्रचार होईल याची नाशिकच्या सर्वच प्रमुख उमेदवारांनी धास्ती घेतली आहे.

सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या. यासंदर्भात सर्व उमेदवारांसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी एक व्हाटस्‌ऍप ग्रुप तयार केला आहे. त्यावर विविध विभागांचे शासकीय संदेश देण्यात येती. उमेदवारांनी आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यासाठी वर्तमानपत्र व इलेक्‍ट्रॉनिक मिडीयात जाहिरात देण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्याचे या बैठकीत स्मरण करुन देण्यात आले.

नाशिक मतदारसंघातील शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे या चारही उमेदवारांवर काही फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याची जाहिरात करणे त्यांना अडचणीचे वाटते. त्यामुळे उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या स्मरणाची चांगलीच धास्ती घेतली आहे. प्रत्येक उमेदवार आधी कोण जाहिरात देतो या प्रतिक्षेत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख