नाशिक महापालिकेतील सत्तेचा गड राखण्यासाठी भाजपला करावा लागणार कडेकोट बंदोबस्त

राज्यातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. त्यात नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण गट किंवा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे या पदासाठी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडे 'दमदार' इच्छुक आहेत. त्याचबोरबर नाशिकमध्येही भाजपचे प्रमुख नेते शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपकडे बहुमत असले तरीही राज्यातील नव्या राजकीय समीकरणांची 'टेस्ट' नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीत होईल. त्यामुळे भाजपला आपला महापालिकेतील सत्तेचा गड राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त करावा लागणार आहे.
Girish Mahajan-Dada Bhuse - Chagan Bhujbal
Girish Mahajan-Dada Bhuse - Chagan Bhujbal

नाशिक : राज्यातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. त्यात नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण गट किंवा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे या पदासाठी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडे 'दमदार' इच्छुक आहेत. त्याचबोरबर नाशिकमध्येही भाजपचे प्रमुख नेते शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपकडे बहुमत असले तरीही राज्यातील नव्या राजकीय समीकरणांची 'टेस्ट' नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीत होईल. त्यामुळे भाजपला आपला महापालिकेतील सत्तेचा गड राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त करावा लागणार आहे.

आज मुंबईत महापालिका महापौरपदाची सोडत काढण्यात आली. त्यात नाशिकचे महापौर खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे दमदार आणि तगडे इच्छुक आहेत. महापालिकेत 122 सदस्य आहेत. त्यातील 66 नगरसेवक असल्याने महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, स्थायी समिती सभापती ही सर्व सत्तेची पदे भाजपकडे होती. विरोधी पक्ष शिवसेनेकडे 34 आहेत. यातील भाजपच्या सरोज अहिरे, शिवसेनेचे दिलीप दातीर यांनी राजीनामे दिले आहेत. दोन्ही कॉंग्रेस, मनसे, अपक्षांची संख्या 19 आहे. गतवेळी शिवसेना, भाजपची युती होती. त्यामुळे महापौर, उफमहापौर पदाची निवडणुक भाजपसाठी एकतर्फी झाली होती. यंदा चित्र पालटले आहे. कालचे मित्र आजचे कट्टर शत्रू झाले आहेत. 

राज्यात दोन्ही कॉंग्रेस, शिवसेनेचे सरकार अस्तित्वात येत आहेत. त्यात जिल्ह्याचे पालकत्व शिवसेना अथवा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असेल. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,  शिवसेनेचे माजी राज्यमंत्री दादा भुसे यांनाही महत्व असेल. त्यात महापौरपद नगरसेवकांतून होईल. मात्र, त्यातगिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे या नेत्यांची  प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या नियंत्रणातील प्रत्येक सतास्थानाला त्याचा धक्का बसू शकतो. त्याची पहिली चाचणी महापौर पदाच्या निवडणुकीत होऊ शकते. 

भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी आमदार बाळासाहेब सानप यांनीच भाजपच्या अनेक नगरसेवकांना उमेदवारी देण्यापासून तर विजयासाठी रसद पुरवण्याचे काम केले होते. त्यांना माननारा एक गट भाजपमध्ये आहे. यातील काही नगरसेवक त्यांच्या गळाला लागू शकतात. सध्या श्री. सानप शिवसेनेत आहेत. गिरीश महाजन आणि सानप यांच्यात तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे राज्यातील नव्या राजकीय समीकरणांपासून नाशिक महापालिकेतील सत्ता सावरणे, वाचवणे व त्यासाठी कडेकोट बंदोबस्त करणे गिरीश महाजनांसाठी महत्वाचे आहे. त्यासाठी ते सावध झाले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com