मुख्यमंत्र्यांच्या सुचनेकडे कानाडोळा करीत भाजप नेत्यांची फलकबाजी

होर्डीग्ज व फलक लावू नका. होर्डींग्ज लावल्याने उमेदवारी मिळत नाही. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुचनेकडे येथील नेत्यांनी कानाडोळा केला आहे. येत्या बुधवारी शहरात येणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी भाजपच्या नेत्यांनी शहरभर फलकबाजी सुरु केली आहे. अर्थात या स्वागत कमानींनी महाजनादेश यात्रेसाठी शहरात चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे.
Nashik BJP Posters To Welcome CMs Mahajanadesh Yatra
Nashik BJP Posters To Welcome CMs Mahajanadesh Yatra

सिडको : होर्डीग्ज व फलक लावू नका. होर्डींग्ज लावल्याने उमेदवारी मिळत नाही. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुचनेकडे येथील नेत्यांनी कानाडोळा केला आहे. येत्या बुधवारी शहरात येणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी भाजपच्या नेत्यांनी शहरभर फलकबाजी सुरु केली आहे. अर्थात या स्वागत कमानींनी महाजनादेश यात्रेसाठी शहरात चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या स्वागतासाठी लावलेले फलक व त्यातून निर्माण झालेली वाहतुकीला अडथळे यावरुन तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. इच्छुकांनी केलेल्या फलकबाजीने कोणाला तिकिट मिळणार नाही. तिकिट कामामुळे मिळेल, फलक लावणाऱ्यांविरोधात कारवाई होईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच पुण्यात दिला असतांना सिडको परिसरात भाजपा आमदार सीमा हिरे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी पाथर्डी फाट्यापासून सिटी सेंटर मॉल परिसरापर्यंत मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या मार्गात फलकबाजी केली आहे. माजी आमदार वसंत गिते यासंह अन्य नेत्यांनीही होर्डींग्ज लावली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या नेत्यांबाबत काय भूमिका घेतात हा चर्चेचा विषय बनला आहे.

पुणे शहरात झालेला प्रयोग नाशिक शहरातही घडतो आहे.  महाजनायात्रेच्या मार्गावरील विविध भागात अनेक झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. सिडको येथे काही जुनी झाडे तोडण्यात आली. ही झाडे तोडण्याबाबत नागरीक आक्षेप घेण्यासाठी जमण्याआधीच झाडांच्या फांद्या गाड्यांत भरुन कर्मचारी निघुनही गेले. मात्र, या वृक्षतोडीविषयी महापालिका उद्यान विभागासह अन्य यंत्रणांनी कानावर हात ठेवले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com