भाजप नेते दिनकर पाटलांचा सभागृहात रात्रभर ठिय्या; महापौरांसह नेत्यांचे फोन स्वीचऑफ 

मिळकतींचा दर ठरविणे, अनधिकृत धार्मिकस्थळे नियमितीकरण, सिडकोतील बांधकाम नियमितीकरण व सेंट्रल किचन रद्द करण्याच्या मागणीसाठी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी महासभेत आंदोलन केले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी राज्य शासनाकडूनच निर्णय अपेक्षित असल्याने शासनाविरोधात आंदोलन करू नका, असा चिमटा काढला. यावरून शाब्दिक वाद रंगल्याने शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले.
भाजप नेते दिनकर पाटलांचा सभागृहात रात्रभर ठिय्या; महापौरांसह नेत्यांचे फोन स्वीचऑफ 

नाशिक : महापालिकेची घरपट्टी वाढ, अनधिकृत धार्मिकस्थळे नियमीत करणे यांसह विविध मागण्यांबाबत सातत्याने चालढकल होत आहे. यावरुन खुद्द भाजपमधूनच संतप्त प्रतिक्रीया आली. विविध कारणांनी सतत वादात राहणारे भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी महापौरांच्या आसनासमोरच आंदोलन सुरु केले. महासभा संपल्यावरही ते सुरुच असून रात्रभर सभागृहातच भाजप नेत्याचे भाजप विरोधात आंदोलन सुरु आहे. महापौर, उपमहापौरांसह सगळेच भाजप नेते फोन 'स्वीचऑफ' करुन निघून गेल्याने पाटील यांचे ठिय्या आंदोलन त्यांच्यावरच बुमरॅंग होण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान या ठिय्या आंदोलनाची दखल कोणत्याही नेत्याने घेतलेली नाही. भाजपचे महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, गटनेते संभाजी मोरुस्कर यांचे फोन 'स्वीचऑफ'  होते. तर आयुक्तांनी आपण प्रशासकीय कामात व्यग्र आहोत. त्यातून मोकळे झाल्यावर संबंधीतांशी बोलू असे सांगीतले. त्यामुळे भाजप विरोधात भाजपच्याच नेत्यांचे रात्रभर सुरु असलेले आंदोलन उपोषणकर्त्यांवर बुमरॅंग होते की वरिष्ठांना हस्तक्षेप करावा लागतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरच या उपोषणाची राजकीय पातळीवर चांगलीच चर्चा सुरु आहे. 

महापालिकेची महासभा विविध कारणांनी गाजली. यावेळी शहरातील मिळकती सील करण्याची कारवाई, धार्मिकस्थळांसह पाडलेली मंदिरे हा विषय गेले काही दिवस सतत चर्चेत राहिला आहे. महापालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत तर राज्यात सरकारही याच पक्षाचे.  त्यामुळे नागरीकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्ष आघाडीवर असायला पाहिजे होते. महापौर रंजना भानसी यांनी काल महासभेत या विषयावर गांभिर्याने विचार करण्याचे आश्‍वसान दिले.

मात्र, यावर समाधान न झाल्याने भाजपच्या सभागृह नेत्यांनीच महापौर आसनासमोर आंदोलन सुरु केले. महासभा संपल्यावर रात्रभर हे ठिय्या आंदोलन सुरुच होते. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने हे आंदोलन करु नये, असे आवाहन शिवसेनेचे अजय बोरस्ते यांन केले. मात्र, त्यांच्या आवाहनाने आंदोलन अधिक चिघळले. 

मिळकतींचा दर ठरविणे, अनधिकृत धार्मिकस्थळे नियमितीकरण, सिडकोतील बांधकाम नियमितीकरण व सेंट्रल किचन रद्द करण्याच्या मागणीसाठी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी महासभेत आंदोलन केले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी राज्य शासनाकडूनच निर्णय अपेक्षित असल्याने शासनाविरोधात आंदोलन करू नका, असा चिमटा काढला. यावरून शाब्दिक वाद रंगल्याने शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले.

पाटील यांनी दादागिरी सहन करणार नसल्याचे सांगत आंदोलनाची भूमिका घेतली. मनसेचे सलीम शेख, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार व रवींद्र धिवरे यांनी पाटील यांना साथ देत ते व्यासपीठावरील आंदोलनात सहभागी झाले. रात्रभर ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे  पाटील यांनी सांगितले. 

मनसे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com