नाशिकच्या इच्छुकांत चर्चा; भाजपचे सर्वेक्षण उमेदवारी देण्यासाठी की कापण्यासाठी?

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे गेले अनेक दिवसांपासून सुरु असलेला भाजप आमदारांचा प्रचार मात्र संथ झाला. पक्षाकडून झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी देणार असे संकेत सगळ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारीची अनिश्‍चितता असलेले जिल्ह्यातील चारही आमदार मुंबईला नेत्यांच्या भेटीगाठींत गुंतले आहेत.
Devayani Pharande - Dr. Rahul Aher Nahik BJP
Devayani Pharande - Dr. Rahul Aher Nahik BJP

नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे गेले अनेक दिवसांपासून सुरु असलेला भाजप आमदारांचा प्रचार मात्र संथ झाला. पक्षाकडून झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी देणार असे संकेत सगळ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारीची अनिश्‍चितता असलेले जिल्ह्यातील चारही आमदार मुंबईला नेत्यांच्या भेटीगाठींत गुंतले आहेत.  उमेदवारीसाठी या सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला आहे.

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे डॉ. राहुल आहेर (चांदवड), सीमा हिरे (नाशिक पश्‍चिम), देवयानी फरांदे (नाशिक मध्य) आणि बाळासाहेब सानप (नाशिक पुर्व) हे चार आमदार आहेत. या चौघांनाही उमेदवारीची अपेक्षा आहे. त्यांनी आपला प्रचार सुरु केला आहे.

     बाळासाहेब सानप

विशेषतः डॉ. राहुल आहेर हे तर गेले अनेक महिने दिवसभर चांदवड तालुक्‍यात ठाण मांडून आहेत. यातील शहरातील तीन पैकी दोन आमदारांना श्रेष्ठींच्या अवाज्ञेमुळे उमेदवारीची चिंता आहे. त्यांची उमेदवारी पुर्णतः पक्षाच्या कथीत सर्वेक्षणावर अन्‌ इच्छुकांच्या हालचाली किती प्रभावी आहेत यावर अवलंबून आहे. 

          सीमा हिरे

डॉ. आहेर यांच्या विरोधात इच्छुकांचा फारसा प्रभाव नाही. मात्र, 'पूर्व'चे बाळासाहेब सानप यांच्या विरोधात पंधरा जणांनी उमेदवारी मागीतली आहे. मध्यच्या आमदार फरांदे यांच्या विरोधात सर्वच इच्छुक संघटीत झाले आहेत. त्यांनी एकत्रीतपणे एकाचट उमेदवाराची शिफारस करण्याची व्युहरचना केली आहे. त्यामुळे सध्या शहरातील सर्वच विद्यमान आमदार मुंबईत नेत्यांच्या संपर्कात आहेत. हे आणदार व त्यांचे पाठीराखे सातत्याने नेत्यांभोवती रुंजी घालण्यात व्यग्र आहेत.

पक्षाचा शहरातील आमदारांच्या कामगिरीविषयी दोनदा सर्व्हे झाल्याचे बोलले जाते. हा सर्व्हे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी संबंधीत कंपनीने केल्याचे सांगीतले जाते. मात्र त्यांनी तो केव्हा व कसा केला याचे सर्वांनाच कोडे पडले आहे. तो करणांरांना कोणीही पाहिलेले नाही. अशा स्थितीत त्याचे निष्कर्ष काय आहेत, याविषयी विद्यमान आमदारांत मोठी धाकधुक आहे. हा सर्व्हे उमेदवारी देण्यासाठी की कापण्यासाठी? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com