आमदार सीमा हिरेंच्या मतदारसंघात भाजपच्या प्रदिप पेशकरांच्या फलकांनी मतदारांचे होतेय मनोरंजन! 

आज जळगाव, धुळे, मालेगाव परिसरातील खानदेशी मतदारांचे प्राबल्य असलेल्या सिडको भागात भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदिप पेशकार यांनी विविध भागात होर्डींग्ज लावली. यामध्ये "आम्हण पक्क शे!, परत आणूत आपलं सरकार, आम्हणा नेता प्रदीप पेशकार !'' असा मजकुर व मोठी छायाचित्र आहेत.
Hoardings Placed By BJP Aspirant in Nashik
Hoardings Placed By BJP Aspirant in Nashik

नाशिक : भाजपच्या विजयाची हवा एखाद्या पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांत किती डोक्यात जाऊ शकते, याचे अचंबीत करणारे चित्र सध्या शहरात पहायला मिळते आहे. अद्याप युतीचे जागावाटप नाही. उमेदवारीची चर्चाही नाही. मात्र येथील भाजपचे नेते प्रदिप पेशकार यांनी त्यांच्याच पक्षाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघात "वरीष्ठांनी माझी उमेदवारी निश्‍चित केली आहे,'' असे सांगत प्रचारफलक लावले. सामान्य नागरीक, कार्यकर्ते या प्रकाराला गांभीर्याने घ्यावे की गंमत म्हणून सोडून द्यावे, या विचारात आहेत.

आज जळगाव, धुळे, मालेगाव परिसरातील खानदेशी मतदारांचे प्राबल्य असलेल्या सिडको भागात भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदिप पेशकार यांनी विविध भागात होर्डींग्ज लावली. यामध्ये "आम्हण पक्क शे!, परत आणूत आपलं सरकार, आम्हणा नेता प्रदीप पेशकार !'' असा मजकुर व मोठी छायाचित्र आहेत. आज सिडको परिसरात ठीक ठिकाणी ते लावण्यात आले. यावरून भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना शह देण्याचा प्रयत्न होत आहे. गेले काही दिवस भाजपचे अनेक नेते असे विविध उपक्रम करुन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यामुळे भविष्यात नाशिक पश्‍चिम मधून भाजपा इच्छुकांची भाऊ गर्दी वाढणार हे निश्‍चित. भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष असलेले प्रदीप पेशकार यांनी अहिराणी भाषेतून खान्देश वासीयांना साद घातल्याचे यावरून दिसत आहे. तर आगामी विधानसभा निवडणूकीत उमेदवारीची मनिषा त्यांनी होर्डिंग्जद्वारे थेट व्यक्त केल्याची चर्चा झाली. सिडको, सातपूर व इंदिरा नगर परिसरात शनिवारी चौका चौकात अशा प्रकारचे फलक लावल्याचे दिसून आले. यातील एक फलक तर सीमा हिरे यांच्या कार्यालयाजवळच लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्थानिक आमदारांचा एकाही फोटोला स्थान देण्यात आलेले नाही.

नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात आपण निवडणूक लढवणार आहोत. हे नक्की झाले आहे. वरिष्ठ पातळीवर आपल्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे होर्डिंग लावण्यात काहीही चुकीचे नाही. मी भाजप पक्षाकडून निवडणूक लढविणार आणि जिंकणार याची मला पूर्ण खात्री आहे - प्रदिप पेशकार, भाजप उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com