नाशिक महापालिकेची पोटनिवडणूक हा भाजपला धोक्याचा इशारा

महाविकास आघाडीने नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा खिशात घातल्या. यात शिवसेनेने जागा राखली तर राष्ट्रवादीने एक जागा मिळवली. वरकरणी ही निवडणूक सोपी वाटत असली तरी तिचे गंभीर परिणाम भाजपच्या महापालिकेतील सत्तेवर होणार आहेत.
MahaVikasAghadi Wins Both the Seats in Nashik Corporation By-Election
MahaVikasAghadi Wins Both the Seats in Nashik Corporation By-Election

नाशिक : महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा महाविकास आघाडीने तीन हजाराच्या मोठ्या मताधिक्‍याने खिशात घातल्या. या पोटनिवडणुकीने भाजपचे संख्याबळ घटले. यात नगरसेवकांचे गुणोत्तर प्रमाण कमी झाले. त्यामुळे महापालिकेया तिजोरीची चावी असलेल्या स्थायी व अन्य विषय समित्या सत्ताधारी भाजपच्या हातून निसटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कालची पोटनिवडणूक भाजपला धोक्‍याचा इशारा ठरली आहे.

प्रभाग २२ (अ) मध्ये राष्ट्रवादीचे जगदीश पवार यांनी ४९१३ मते मिळवत भाजपच्या सारिका शिरसाठ यांचा ३३८८ मतांनी पराभव केला. भाजपचे बंडखोर रामदास सदाफुले यांना १०७१ मते मिळाली. प्रभाग २६ (अ) मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी ५८६५ मते मिळवून 'मनसे'चे दिलीप दातीर यांचा २८१२ मतांनी पराभव केला. यात भाजपचे कैलास अहिरे यांना अवघी १०२१  मते मिळाली. महाविकास आघाडीने या दोन्ही जागा खिशात घातल्या. यात शिवसेनेने जागा राखली तर राष्ट्रवादीने एक जागा मिळवली. वरकरणी ही निवडणूक सोपी वाटत असली तरी तिचे गंभीर परिणाम भाजपच्या महापालिकेतील सत्तेवर होणार आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीत २०१७ मध्ये १२२ पैकी भाजपचे ६६ सदस्य निवडून आले होते. त्याखालोखाल शिवसेना ३५, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी सात, मनसेचे पाच, रिपाइंचा एक सदस्य होता. महापौर, उपमहापौरांच्या निवडणुकीत सत्ता मिळविताना स्थायी समितीवर गुणोत्तर प्रमाणाच्या आधारे नगरसेवक निश्‍चित करताना ८.६६ कोटा होता. त्यानुसार समितीवर नऊ सदस्य नियुक्त होत होते. सोळा सदस्यांच्या तुलनेत बहुमत होते. शिवसेनेचे ४.५३ गुणोत्तर होत असल्याने चार, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी ०.९३ व मनसेचे ०.८० इतके गुणोत्तर असल्याने प्रत्येकी एका सदस्याची नियुक्ती स्थायी समितीवर होती. 

परंतु प्रभाग २२ च्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने तसेच एका नगरसेविकेचे निधन झाल्याने आणखी एक जागा रिक्त होऊन भाजपचे गुणोत्तर प्रमाण घटले आहे. सध्या भाजपकडे ६४ सदस्य आहेत. सद्यःस्थिती लक्षात घेता भाजपचे गुणोत्तर प्रमाण ८.४६ इथपर्यंत आल्याने स्थायी समितीवर आता नऊऐवजी आठ सदस्य जातील. हेच प्रमाण आरोग्य व वैद्यकीय, विधी, महिला व बालकल्याण तसेच शहर सुधार समितीच्या बाबतीत असल्याने सर्वच समित्यांवर भाजपला एका सदस्याची गरज भासणार आहे. शिवसेनेच्या वाढलेल्या गुणोत्तर प्रमाणामुळे सेनेचा एक सदस्य वाढल्याने महाविकास आघाडी म्हणून सहजपणे भाजपकडून सत्ता हिसकावून घेता येणे शक्‍य होणार आहे. भाजपला मनसेने साथ दिल्यास सत्तेची राजकीय खेळी अवघड नाही.

पूर्वी ६६ सदस्यांमुळे ८.६६ गुणोत्तर होते. ०.६६ अपूर्णांक अतिरिक्त असल्याने आणखी एक असे नऊ सदस्य स्थायी ०.५३ ही संख्या मोठी असल्याने शिवसेनेचे चारऐवजी पाच सदस्य नियुक्त होतील. म्हणजे विरोधकांचे आठ, तर भाजपचे आठ असे समसमान बलाबल होणार असल्याने यातून शिवसेना सत्तेची संधी साधू शकते. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पॅटर्न यशस्वी झाल्याने हा भाजपच्या सत्तेला इशारा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com