उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत गेलेले बाळासाहेब सानप शिवसेनेत; गिरीश महाजनांना चेकमेट?

Balasaheb Sanap Enters Shivsena in Presense of Uddhav Thakray
Balasaheb Sanap Enters Shivsena in Presense of Uddhav Thakray

नाशिक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांना भाजपची उमेदवारी नाकारली. त्यामुळे सानप विधानसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेले. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर सानप यांनी आज सकाळी मुंबईत उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने भाजपची झोप उडाली आहे.

माजी आमदार सानप यांनी आज पुर्णतः गुप्तता पाळत शिवबंधन बांधले. दुपारी ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांशी संबंध बिघडल्याने ते विद्यमान आमदार असतांना त्यांना उमेदवारी नाकरण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. या प्रचारादरम्यान अचानक शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी खासदार राऊत यांनी सानप यांच्यातील स्वयंसेवक अद्यापही कायम आहे. असे विधान केले होते. या पार्श्‍वभूमीवर आजचा शिवसेनेतील प्रवेश सुचक मानला जातो आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. महापालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत आहे. पक्षाचे सहासष्ट नगरसेवक आहेत. यातील बहुतांश नगरसेवक सानप यांना मानणारे आहेत. सानप यांच्या प्रमाणेच उमेदवारी न मिळाल्याने अन्य नेत्यांना माननारे नगरसेवकही नाराज आहेत. अशा स्थितीत आगामी महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना प्रवेशसुचक मानला जातो. यातून गिरीश महाजन यांच्या ताब्यातील महापालिकेच्या सत्तेला थेट आव्हान मिळण्याची भिती आहे. त्यासाठी छुप्या हालचालींना या प्रवेशाने चालना मिळेल. त्यामुळे हा भाजपला राजकीय धक्का आहे. याशिवाय गिरीश महाजनांच्या राजकीय प्रतिष्ठेला आव्हान मिळण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com