जिल्हाबंदी असूनही पुण्याच्या ३००० गाड्या नाशिकला पोहोचल्याने वाढली चिंता

कोरोना विरोधात अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात जिल्हा बंदी आहे. तरीही गेल्या चोवीस तासांत पुण्याची तीन हजारांहून अधिक वाहने नाशिक शहरात दाखल झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे
Nashik Administration Worried about Vehicles Coming From Pune
Nashik Administration Worried about Vehicles Coming From Pune

नाशिक  : कोरोना विरोधात अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात जिल्हा बंदी आहे. तरीही गेल्या चोवीस तासांत पुण्याची तीन हजारांहून अधिक वाहने नाशिक शहरात दाखल झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाविरोधात आणखी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल १४४ कलमाचा प्रभावी उपयोग होत नसल्याने संचारबंदी लागू केली. राज्यात सगळीकडे जिल्हा बंदी आहे. रस्ते, महामार्गावरील वर्दळ कमी करण्यासाठी अतिशय कडक निर्बंध लागू झाले आहेत. मात्र असे असले नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर आज सकाळी ११ वाजेपर्यंत ३९२० वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये तीन हजार वाहने पुणे शहर व परिसरातील आहेत. पुणे शहरात अत्यंत कडक संचारबंदी आहे. रस्त्यावर वाहनांना बंदी आहे. जिल्हा बंदी आहे. तरीही एव्हढी वाहने नाशिक शहरात कशी दाखल झाली? हा चिंतेचा विषय आहे.

नाशिक जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. याशिवाय जिल्ह्याच्या सीमेवर ४७ ठीकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. यामध्ये शिर्डी रस्त्यावर वावी येथे आणि पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे येथे तपासणी नाके आहेत. वावी येथे शिर्डी आणि नगर जिल्ह्यातील वाहने येतात. त्यांची संख्या नगण्य आहे. शिर्डी बंद असल्याने मुंबईतील भाविकांचा ओघ बंद झाला आहे. त्या तुलनेत नांदूर शिंगोटे येथे मात्र वाहनांची संख्या लक्षणीय आहे. यातील प्रत्येकाची आरोग्य आणि महसूल विभागाकडून तपासणी केली जाते. हातावर कोरंटाईन केले अथवा अन्य तपासणी होते. संशयास्पद व्यक्तींना बाजूला केले जाते. यामध्ये अद्याप एकही संशयास्पद रूग्ण आढळलेले नाही दिलासादायक आहे. मात्र, पुणेकरांचा नाशिक शहरातील वाढता ओढा चिंतेची बाब ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com